Agnihotra Importance: जीवन उन्नत करणारे : अग्निहोत्र

नित्‍याने अग्‍निहोत्र करणाऱ्या कुटुंबांमध्ये अनेक सकारात्‍मक परिणाम दिसून आले आहेत. परंतु या प्रक्रियेत नियमांचे पालन होणे महत्त्वाचे आहे.
Agnihotra Importance
Agnihotra Importanceesakal
Updated on

"अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या गुरुपीठावरील सिद्धपुरुष, वेद धर्माचे प्रवर्तक परमसद्‌गुरू श्री गजानन महाराज यांनी वेदांचे पुनरुज्जीवन केले. वेदांचे सार स्वरूप यज्ञ, दान, तप, कर्म व स्वाध्याययुक्त पंचसाधन मार्गाची शिकवण दिली.

यज्ञांतर्गत सहज, सुलभ असे अग्निहोत्र सर्वांसाठी प्रकट केले. येत्‍या २ जानेवारीला राजीवनगर येथील सदिच्‍छानगर, क्रिकेट मैदानावर सामुदायिक अग्‍निहोत्र होत असून, यानिमित्त अग्निहोत्राचे महत्त्व सांगणारा हा लेख." - नाना गायकवाड, सचिव, विश्‍व फाउंडेशन शिवपुरी, अक्‍कलकोट

नित्‍याने अग्‍निहोत्र करणाऱ्या कुटुंबांमध्ये अनेक सकारात्‍मक परिणाम दिसून आले आहेत. परंतु या प्रक्रियेत नियमांचे पालन होणे महत्त्वाचे आहे. या लेखाच्‍या माध्यमातून आपण ही संपूर्ण प्रक्रिया सखोलपणे जाणून घेऊ या...

अग्निहोत्र कसे करावे

नित्य स्थानिक सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस पिरॅमिडसारखा आकार असलेल्या तांब्याच्या (अथवा मातीच्या) पात्रात गायीच्या शेणाच्या गोवऱ्यांपासून तयार केलेल्या अग्नीत समंत्रक गायीचे तूप माखलेल्या दोन-दोन चिमटी अखंड तांदळाच्या आहुती देणे म्हणजे अग्निहोत्र. अग्निहोत्र कोणतीही व्यक्ती करू शकते. जात/पात, धर्म, भाषा, देश, स्त्री/पुरुष या भेदांपलीकडील ही उपासना आहे. अग्निहोत्र अत्यंत कमी वेळात म्हणजे पाच मिनिटांत संपन्न होतो. खर्चही फारच कमी येतो.

खालील पाच नियम अचूकपणे पाळणे मात्र महत्त्वाचे

१. स्थानिक सूर्योदय-सूर्यास्ताच्या नेमक्या वेळेला अग्नीत आहुती देणे

२. अर्ध पिरॅमिड आकाराचे तांब्याचे अथवा मातीचे पात्र

३. गोवंशाच्या गोवऱ्याचा अग्नी

Agnihotra Importance
Gajanan Maharaj Paduka: श्री गजानन महाराजांच्‍या चैतन्‍य पादुका नाशिकमध्ये; भाविकांना संपर्काचे आवाहन

४. दोन आहुती, दोन चिमूट अखंड कच्च्या तांदळाला दोन थेंब गायीचे तूप माखून त्याच्या दोन आहुती अग्नीत द्यायच्या

५. दोन संस्कृत मंत्र

सूर्योदयाचे मंत्र :

सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं न मम । (पहिला मंत्र)

प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम ।। (दुसरा मंत्र)

सूर्यास्ताचे मंत्र :

अग्नये स्वाहा, अग्नये इदं न मम । (पहिला मंत्र)

प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम ।। (दुसरा मंत्र)

आज जगात चाळीसपेक्षा अधिक देशांमध्ये हजारो लोक अग्निहोत्र करीत आहेत. त्या सर्वांचा हाच अनुभव, की अग्निहोत्रने आमचे जीवन बदलले आहे. जीवन साफल्याचा अनुभव आम्हास येत आहे.

अग्निहोत्राचे लाभकारी अनुभव

- वातावरण शुद्धी

- मनःशांती व स्वास्थ्य

- विचारांची स्पष्टता व विकारांचा समतोल

Agnihotra Importance
Gajanan Maharaj: गजानन महाराजांच्या भक्तांसाठी मोठी बातमी; शेगाव मंदिर ३१ डिसेंबरला रात्रभर राहणार खुले

- रोगजंतूंचे निरोधन (Bacteriostatic)

- उर्वरित अग्निहोत्र भस्म हे उत्तम औषध व प्रभावी खत म्हणून अनुभवास आले आहे. पाण्यात मिसळल्यास पाण्याचा PH सुधारतो

- मनोबल वाढल्याने व्यसनमुक्तीसाठी सहाय्यक

- अग्निहोत्र वातावरण योगाभ्यास करण्यासाठी अतिउत्तम

अग्निहोत्र जीवनाला उन्नत दिशा देते. अग्निहोत्र सुरू केल्यानंतर जीवनात मोठा सकारात्मक बदल होतो, याचा अनुभव येतो. आपणही आजच अग्निहोत्र सुरू करून सफल जीवनाचा अनुभव घ्या.

सामूहिक अग्‍निहोत्र उपक्रमात सामील व्‍हा

विश्‍व फाउंडेशन शिवपुरी, अक्‍कलकोट आणि अष्टविनायक मित्रमंडळ व माउली संस्‍था नाशिक आयोजित सामुदायिक अग्‍निहोत्रामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. परमसद्‍गुरू श्री गजानन महाराज यांचे नातू डॉ. पुरुषोत्तम महाराज राजीमवाले यांची प्रमुख उपस्‍थिती राहाणार आहे. परमपूज्य, श्रीजीच्‍या पादुकांचे दर्शन व महाआरतीचा लाभ घेण्याची संधी भाविकांना असणार आहे.

कार्यक्रमाचा तपशील असा ः

तारीख ः २ जानेवारी २०२४

वेळ ः दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजता

ठिकाण ः सदिच्‍छानगर, क्रिकेट मैदान, राजीवनगर

संपर्क क्रमांक : ७४४७४ ८९१०१

विश्व फाउंडेशन, अक्कलकोट

Agnihotra Importance
Gajanan Maharaj Paduka : सदिच्छानगरला 2 जानेवारीला सामुदायिक अग्निहोत्र; गजानन महाराजांच्या चैतन्य पादुकांच आगमन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.