समाजमन : शरीराच्या तापमानाविषयी सजग व्हा..!

Latest Marathi Article : सर्वसाधारण तापमानात पंधरा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
summer heat
summer heat esakal
Updated on

लेखक : ॲड. नितीन ठाकरे

सर्वसाधारण तापमानात पंधरा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे आपल्या आरोग्यावरही विपरित परिणाम होत आहे. तापमानाबद्दल आपण अनेकवेळा चर्चा करत असतो, ऐकत असतो. आपल्या शरीरात किती तापमान निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहे, याबद्दल आपण आता सजग राहण्याची आवश्यकता आहे.
(article by author adv nitin thackeray Be aware of body temperature)

बाहेरच्या उकाड्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी माणसाचे शरीर सतत काम करत असते. मात्र काहीवेळा उष्णता सहन न झाल्यामुळे माणसाला आरोग्याच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. माणसाचे शरीर जास्तीत जास्त किती तापमान सहन करू शकते, शरीराला नैसर्गिकरीत्या थंड ठेवण्याची शरीराची प्रक्रिया काय असते, याबद्दल आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे.

उष्माघात धोकादायक

दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे. गेल्या काही वर्षांत उन्हाळ्याच्या दिवसांत पारा सहज ४९ ते ४२ अंशांच्या जवळपास जातो. फेब्रुवारीपासूनच हवेतील उष्णता वाढू लागते. यंदा तर मेपर्यंत प्रचंड उष्णता जाणवत आहे. देशभरात यंदा उन्हाळा चांगलाच जाणवत आहे. लोकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. देशात दर वर्षी उष्माघातामुळे काही जणांचे प्राण जातात. माणसाचे शरीर जास्तीत जास्त किती तापमान सहन करू शकते.

हायपोथॅलॅमसचे कार्य महत्त्वाचे

माणसाच्या शरीराचे सामान्य तापमान ९८.६ अंश फॅरेनहाइट असते. हे तापमान बाहेरच्या तापमानाच्या म्हणजे ३७ अंश सेल्सिअसच्या जवळ जाणारे असते. माणूस जास्तीत जास्त ४२.३ अंश सेल्सिअस तापमानात सहजपणे राहू शकतो. माणूस हा उष्ण रक्त असलेला प्राणी असतो. होमिओस्टॅसिस या खास प्रक्रियेद्वारे माणूस उष्णतेपासून संरक्षण मिळवत असतो. या प्रक्रियेद्वारे हायपोथॅलॅमसच्या सहाय्याने शरीराचे तापमान जिवंत राहण्यासाठी नियंत्रित करण्याचे काम होत असते. (latest marathi news)

summer heat
समाजमन : मतदानाचा पवित्र हक्क बजावा!

भारतात उष्णतेत वाढ

मानवी शरीर ३५ ते ३७ अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानात सहज राहू शकते. तापमान ४० अंशांच्या पुढे गेले, की त्याचा त्रास होऊ लागतो. ५० अंशांपर्यंतचे तापमान सहन करणे तर अशक्य होते. अशा तापमानात राहणे जोखमीचे असते. एका अहवालानुसार काही वर्षांत भारतात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली आहे. यात प्रामुख्याने आठ वर्षांत तर ती सर्वाधिक वाढली आहे. या काळात भारतात उष्णतेमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये वाढ झाली होती.

जिवंत राहण्यासाठी किती तापमान हवे

मानवी शरीरात हायपोथॅलॅमस तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. माणसाच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावणे, घाम येणे, तोंडाने श्वास घेणे, ताजी हवा मिळविण्यासाठी मोकळ्या जागेत जाणे यामुळे हायपोथॅलॅमसला ऊर्जा मिळते.

त्याद्वारे हायपोथॅलॅमस मानवी शरीरातले तापमान नियंत्रित करते. त्यामुळे हवेतील उष्णता वाढली, तरी मानवी शरीर ते एका मर्यादेपर्यंत सहन करते. ज्या भागात हवामान सतत बदलत असते, तिथे ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान माणसासाठी घातक समजले जाते. माणूस जास्तीत जास्त किती तापमानात जिवंत राहू शकतो, याबद्दल संशोधन सुरू आहे.

४८ ते ५० अंश धोकादायक

वाढत्या तापमानाचा माणसाच्या शरीरावर खूप गंभीर परिणाम होतो. त्या परिणामांबद्दल बोलताना डॉक्टर किंवा संशोधक कायम ‘हीट स्ट्रेस’ या शब्दाचा उल्लेख करतात. मानवी शरीर जेव्हा खूप उष्णतेचा सामना करते, तेव्हा शरीराच्या आतले तापमान नियंत्रित राखण्यासाठी शरीर प्रयत्न करते. बाहेरचे वातावरण आणि प्रत्येक माणसाची प्रकृती यावर ते शरीर किती मर्यादेपर्यंत शरीराचे तापमान नियंत्रित करू शकते, हे अवलंबून असते.

summer heat
समाजमन : मानवनिर्मित भूमी प्रदूषणामुळे सजीवाला धोका

अशा वेळी आपल्याला थकवा जाणवतो. पारा ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचला असेल, तर शुद्ध हरपणे, चक्कर येणे, जीव घाबरा होणे अशा गोष्टी जाणवू शकतात. यामुळे रक्तदाब कमी होणे हेही सामान्य असते. मात्र ४८ ते ५० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानात जास्त वेळ राहिल्यास शरीर ते सहन करू शकत नाही व प्रसंगी मृत्यूही ओढवू शकतो.

उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या

माणसाच्या शरीरात उष्णता व थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नैसर्गिकरीत्या शरीराचे तापमान नियंत्रित केले जाते. त्यासाठी शरीरात खास प्रक्रिया होते. मानवी शरीर ७० टक्के पाण्यापासून बनलेले असते. शरीरातले हेच पाणी वाढत्या उष्णतेचा सामना करताना शरीराला थंड ठेवण्यासाठी प्रयत्न करत असते. या प्रक्रियेमुळे आपल्याला घाम येतो व शरीर थंड राहते. मात्र जास्त काळ हे सुरू राहिले, तर शरीरातले पाणी कमी होते.

त्यामुळे चक्कर येऊ शकते. काही वेळा डोकेही दुखू शकते. तसेच यामुळे शुद्धही हरपू शकते. शरीरातले पाणी कमी झाल्यामुळे श्वासोच्छ्वासावर परिणाम होतो. रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहण्यात अडचणी येतात त्यामुळे हृदय व फुफ्फुसावर ताण येतो. यामुळे रक्तदाबावर परिणाम होतो. त्यामुळे उन्हाळ्यात भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

नागरिकाचे योग्य योगदान आवश्यक

माणसाच्या शरीरात तापमान नियंत्रण करण्यासाठी खास प्रक्रिया होत असली, तरी एका मर्यादेच्या पलीकडे शरीरावर उष्णतेचा गंभीर परिणाम होतो. त्यामुळे उष्णता कमी करण्यासाठीच प्रत्येक नागरिकाचे योग्य योगदान आवश्यक आहे. यासाठी निसर्गात प्रदूषणामुळे जी उष्णता निर्माण होत आहे, त्यासाठी पर्यावरणपूरक अशा बाबी स्वीकाराव्यात.

(लेखक मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस आहेत.)

summer heat
समाजमन : प्रदूषण मानवापुढील गंभीर समस्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com