समाजमन : मतदानाचा पवित्र हक्क बजावा!

Nashik News : आपला देश आपल्यासाठी सर्वोच्च आहे. आपल्या प्रत्येकामध्ये देशभक्ती असतेच; मात्र ती प्रत्येकाची व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
nashik Lok Sabha Election
nashik Lok Sabha Electionesakal
Updated on

लेखक : ॲड. नितीन ठाकरे

आपला देश आपल्यासाठी सर्वोच्च आहे. आपल्या प्रत्येकामध्ये देशभक्ती असतेच; मात्र ती प्रत्येकाची व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते. जेव्हा क्रिकेट मॅच सुरू असते तेव्हा आपले देशप्रेम उफाळून येते. काही आदर्श नागरिक सरकारी नियमांचे पालन करून ते देशप्रेम व्यक्त करत असतात. काही आपला परिसर स्वच्छ ठेवण्यातही देशभक्ती बघतात. कोणी परदेशात गेले असेल, तर आपल्या देशातील आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य याचे महत्त्व तेथे कळते.

म्हणूनच हे स्वातंत्र्य आपले अबाधित राहावे, यासाठी देशभक्ती प्रत्येकाच्या मनात पाहिजेच, त्याबद्दल दुमतच नाही. लोकसभा निवडणुकीचे सोमवारी (ता. २०) मतदान होत आहे. आपण प्रत्येकाने आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावून एक आदर्श नागरिक आहोत, असे दाखवून दिले पाहिजे. (article by Author Adv Nitin Thackeray exercise sacred right to vote)

मी एकट्याने मतदान नाही केले तर काय फरक पडतो, मतदानानिमित्त सुटी आहे, या सुटीचा आनंद उपभोगू या, कुठेतरी सहल काढू या, हे विचार म्हणजे नाकर्तेपणाचा कळस होतो. पण ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे एकेका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उपयुक्त होतो, ही बाब गांभीर्याने लक्षात घ्यायला हवी. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन.

या दिवशी प्रत्येक भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती ओसंडून वाहते. याच पद्धतीने ध्वज दिन निधी संकलनासही जनता सढळहस्ते मदत करते. नैसर्गिक आपत्ती असो किंवा युद्धजन्य परिस्थिती, प्रत्येक भारतीय नागरिक देशप्रेमाने भारावून जाऊन मदतीसाठी पुढे सरसावतो व आपल्या परिस्थितीनुसार मदत करतो. तसेच मतदानाबाबतही लोकांच्या मनात अशी कर्तव्यभावना निर्माण करण्याची नितांत गरज आहे.

सबब सांगू नका

मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क, अधिकार आहे. त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली आणि आपण ही पद्धती अजूनही टिकवून ठेवली आहे. लोकशाहीने अनेक सुविधा, अधिकार, हक्क आपल्याला दिले आहेत.

nashik Lok Sabha Election
समाजमन : ‘श्रीराम’ हे आदर्श व्यक्तिमत्त्व

दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी बजावलेल्या मतदानाच्या अधिकारातून केंद्रात शासन स्थापन होते. येथे चांगली माणसे/राज्यकर्ते असावेत, असे एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला वाटत असेल, तर कोणतीही सबब न सांगता प्रत्येकाने मतदान करावे.

चांगले राज्यकर्ते निवडा

चांगले राज्यकर्ते निवडून येण्यासाठी आपल्या प्रत्येकाचे एकेक मत महत्त्वाचे आहे. ते देशातील लोकशाहीच्या भवितव्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठीही खूप गरजेचे आहे. त्यामुळे मतदान टाळू नये. मतदानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांना देशात कसा बदल हवा आहे, त्यांना कसे राज्यकर्ते हवे आहेत, हे कळते. त्या दृष्टीनेही मतदान महत्त्वपूर्ण आहे.

आपण कोण आहोत, आपल्याला जीवनात काय हवे आहे ते ठरविण्यासाठीही मतदानाची मदत होऊ शकते. कारण मतदानाच्या माध्यमातून राज्यकर्ते निवडले जातात आणि योग्य व चांगले राज्यकर्ते निवडून दिले, तर आपल्याला जे हवे आहे त्या अपेक्षा ते पूर्ण करू शकतात. पण त्यासाठी प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे. (latest marathi news)

nashik Lok Sabha Election
समाजमन : सकारात्मक, संघटित युवाशक्तीचे बळ

भारतात मतदानाचे महत्त्व

मतदान लोकशाहीची कोनशिला आहे आणि भारताच्या राजकीय परिदृश्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. हे नागरिकांना त्यांचे प्रतिनिधी निवडण्याचा आणि निर्णयप्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार वापरण्याची परवानगी देते. मतदानाद्वारे व्यक्तींना त्यांच्या निवडलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कृती आणि धोरणांसाठी जबाबदार धरण्याचा अधिकार आहे.

मतदान एक निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूकप्रक्रिया सुनिश्चित करते. सामाजिक आणि राजकीय समानतेला प्रोत्साहन देते. लोकांच्या इच्छा आणि आकांक्षा प्रतिबिंबित करणारे सरकार स्थापन करण्यात मदत करते. मतदानाद्वारे नागरिकांना विविध विषयांवर त्यांचे मत मांडण्याची आणि राष्ट्राच्या विकासात योगदान देण्याची संधी आहे. मतदानामुळे समाजातील उपेक्षित घटकांना सशक्त बनवते, ज्यामुळे त्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या बाबींमध्ये त्यांचे म्हणणे मांडता येते.

हे जबाबदार आणि प्रतिसाद देणाऱ्या सरकारच्या वाढीस प्रोत्साहन देते. कारण निवडून आलेले प्रतिनिधी त्यांच्या घटकांच्या चिंतेकडे लक्ष देण्याची अधिक शक्यता असते. जास्त मतदानामुळे लोकशाही व्यवस्थेची वैधता आणि विश्वासार्हता मजबूत होते. मतदान हा केवळ अधिकारच नाही, तर एक नागरी कर्तव्यदेखील आहे आणि त्याचा वापर करून व्यक्ती लोकशाहीप्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतात आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीला हातभार लावतात.

(लेखक मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस आहेत.)

nashik Lok Sabha Election
समाजमन : प्रदूषण मानवापुढील गंभीर समस्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.