Ganeshotsav 2023: गुलशनाबादमध्ये कृत्रिम फुलांची बाजारपेठ फुलली! गणेशोत्सवानिमित्त मागणी वाढली

Marketed artificial flowers and articles thereof
Marketed artificial flowers and articles thereofesakal
Updated on

Ganeshotsav 2023 : फुलांच्या शहरात कृत्रिम फुलांची बाजारपेठ वाढली आहे. गणेशोत्सवानिमित्त कृत्रिम प्लास्टिक फुलांना आणि त्यापासून तयार केलेल्या विविध वस्तूंना मागणी वाढली आहे.

एकदा घेतलेल्या वस्तू वारंवार पुनर्वापर होत असल्याने नागरिकांचा खरेदीकडे कल वाढला आहे. (Artificial Flower Market Blooms in city Demand increased on occasion of Ganeshotsav 2023 nashik)

कधीकाळी फुलांचे शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये गुलाबाची शेती मोठ्या प्रमाणावर होत असल्याने गुलशनाबाद असे संबोधण्यात येत होते. अशा नैसर्गिक फुलांच्या शहरात कृत्रिम प्लॅस्टिक फुलांची शेती बहरली आहे.

सार्वजनिक मंडळासह घरगुती आराससाठी वापर वाढला आहे. त्यांना होणारी मागणी लक्षात घेता प्लॅस्टिक पानाफुलांच्या विविध वस्तू बाजारात विक्रीस आल्या आहे. कानडे मारुती लेन यांची मुख्य बाजारपेठ ठरत आहे.

अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने खरेदीसाठी येथे नागरिकांची गर्दी लोटली आहे. तोरण, गालिचे, माळ, हार, लढ, फूल अशा विविध वस्तू खरेदी विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.

नैसर्गिक फुलांची आवक कमी झाल्याने त्यांचे दर वाढले आहे. सामान्य नागरिकांना नैसर्गिक फुलांचे हार, तोरण, माळी घेणे शक्य होत नाही. घेतल्यास त्यांचा एकच दिवस वापर होत असतो.

त्यापेक्षा निम्म्या किमतीत कृत्रिम फुलांचे हार, तोरण, माळी घेतल्यास संपूर्ण गणेशोत्सवात त्यांचा वापर होणार आहे.

आगामी दिवाळी, दसरा, नवरात्री यासाठीही त्यांचा पुनर्वापर होऊ शकतो. या कल्पनेने नागरिकांचा कृत्रिम फुलांकडे कल वाढला आहे. यामुळे बाप्पाला देखील प्लास्टिक फुलांचा सुगंध घेण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Marketed artificial flowers and articles thereof
Ganeshotsav 2023 : सर्वोत्कृष्ट गणेश मंडळाला 11 लाखांचे पारितोषिक! शेवटचे 4 दिवस बारापर्यंत देखावे खुले

असे आहे दर

कृत्रिम फुलाच्या वस्तू दर

हार १० ते १२५

फूल लड ३० ते २००

गुलाब, जरबेरा फूल ६० ते ९० डझन

वेल जाळी ३५० अडीच फूट

वेल पीस १०० पीस

तोरण ६० ते १ हजार

झेंडू फूल १२० पाकीट

कमल फूल ३५ रुपये पीस

गालिचा ८० रुपये

ग्रास गालिचा ८० रुपयांपासून पुढे

सूर्यफूल १२० डझन

मोतीहार १० ते १३०

"नैसर्गिक फुलांच्या वाढते दर आणि कृत्रिम फुलांचा पुनर्वापरामुळे प्लॅस्टिक फूल तसेच त्यापासून बनवलेल्या वस्तूं खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. शिवाय गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वीस ते पंचवीस टक्के दर कमी झाले आहे." - नरेश कारिया, व्यावसायिक

Marketed artificial flowers and articles thereof
Ganeshotsav 2023: वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या मंडपावर कारवाई! पोलिस आयुक्तांचा गणेश मंडळांना इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.