Nashik News: चिऊ चिऊ ये..चारा खा..पाणी पी अन् भूर्रर्र उडून जा..! अंबासनच्या विद्यालयाचे पक्षीप्रेम

अंबासनच्या विद्यालयात पक्षांसाठी कृत्रिम घरटे व दाणापाण्याची केली सोय
birds file photo
birds file photoesakal
Updated on

अंबासन (जि. नाशिक) : चिऊ चिऊ ये...चारा खा...पाणी पी अन् भूर्रर्र उडून जा... अशी बालगीत आपण नेहमीच ऐकतो मात्र याच चिऊताईला आता तीव्र उन्हाळ्यात दाणा पाण्यासाठी वणवण भटकंती होऊ नये यासाठी येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सैरभैर झालेल्या पक्षांसाठी साद प्रतिसादने कृत्रिम घरटी बसवून संगोपन करण्याचा निर्धार केला आहे. (Artificial nests and feeding facilities for birds have been provided in Ambasans school nashik news)

   उन्हाळ्यात पक्षांची अन्न व पाण्यासाठी भटकंती थांबविण्यासाठी मविप्र संचलित नूतन विद्यालयातील मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना मोरे यांच्या संकल्पनेतुन चिमण्यांच्या संवर्धनासाठी निवा-याची जागा कमी झाल्या आहेत.

झाडी, ज्यांच्यावर पक्ष्यांना घरटी करायची असतात, त्यांची संख्या कमी होते आहे. अशा अनेक कारणांमुळे पक्ष्यांच्या अधिवासावर संक्रांत आलेली आहे. अन्न आणि निवारा याच पक्ष्यांच्या दोन मुख्य गरजा आणि त्यातील निवाऱ्याचाच प्रश्‍न भेडसावू लागल्याने पक्ष्यांच्या संख्येवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे.

अशा सैरभैर झालेल्या पक्षांसाठी साद प्रतिसादने कृत्रिम घरटी बसवून संगोपन करण्याचे ठरवले आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी फ्लाॅस्टिकच्या वापरात नसलेल्या वस्तू, नारळाची कवटी, पृष्ठा आदि टाकाऊ वस्तू जमा करून चिमण्यांसाठी निवा-यासाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून पक्षांची तहान भागविली जात आहे. विद्यालयाच्या प्रांगणात फ्लाॅस्टिकच्या बाटल्यांच्या माध्यमातून झाडावर पक्षांसाठी पाणी तसेच अन्न उपलब्ध करून दिले जात आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

birds file photo
Know Your Army : 'या' तारखेपासून ‘नो युवर आर्मी’ लष्कर प्रदर्शन

विद्यार्थ्यांकडून प्रतिसादाचे आवाहन

...दिवसभर विद्यालयाच्या प्रांगणात जेव्हा-जेव्हा पक्षी अन्न व पाणी घेण्यासाठी जमा होतात तेव्हा विद्यार्थ्यांकडून आनंद व्यक्त केला जातो. प्रत्येक नागरिकाने असे प्रयत्न केले पाहिजे असे अभिमानाने सांगतात. त्याप्रमाणे आपल्या परिसरातील नागरिकांनाही या उपक्रमाची माहिती देऊन त्याचा अवलंब करण्यास विनंती करीत आहेत. एकूणच या चिव-चिवणा-या पक्षांना कडक उन्हाळ्यात जीवदान देऊन तृष्णा भागवली जावी यासाठी नागरिकांनी किमान एक तरी वाटी व पाण्याची सोय गॅलरीत किंवा छतावर ठेवावी अशी आर्तहाक विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

"विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच नैतिक शिक्षणाचे धडे मिळावेत आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन विकसित व्हावा या हेतूने विद्यार्थ्यांकडून पक्षांसाठी विना वापरात असलेल्या वस्तूपासून कृत्रिम घरटे तयार केले. विद्यार्थ्यांमध्ये यावेळी उत्साहपूर्ण वातावरणात निर्माण झाले होते."

- महेंद्र पाटील, शिक्षक

"पर्यावरणाचा व पशुपक्षांचा जो रास होत आहे. भावी पिढीला जनजागृती निर्माण करण्यासाठी विद्यालयात चिमण्यांना अन्नपाण्याची व्यवस्था करण्यासाठी एक स्तुत्य उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये पक्षीप्रेम निर्माण व्हावे आणि चिमण्यांचे संरक्षणासाठी त्याचे निवारा, अन्नपाणी याची व्यवस्था विद्यार्थ्यी करीत आहेत आणि हि काळाची गरज आहे."

- कल्पना मोरे, मुख्याध्यापिका.

"उन्हाळ्यात आपल्याला जशी पाण्याची गरज भासते त्याप्रमाणेच पक्षांनाही भासत असते. म्हणून आम्ही पक्षांसाठी कृत्रिम घरटे व अन्नपाण्याची सोय उपलब्ध करून देत आहोत यामुळे पक्षांचे निरीक्षक करायलाही मिळणार आहे." - सुहाणी सोनवणे, विद्यार्थिनी

birds file photo
Nashik News : द्राक्षविक्री अन मुलामुलीचे लग्न सारखेच! डॉ. शेखर यांचे शेतकऱ्यांना आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.