वडनेर भैरव (जि. नाशिक) : येथील मोरांचा अधिवास असलेल्या लोधाई माता टेकडीवर मोरांसाठी (Peacock) कृत्रिम पाणवठे (Artificial ponds) तयार करण्यात आले असून, परिसरातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने पाणी टाकण्यात आले. त्यामुळे मोरांच्या अन्न- पाण्याचा प्रश्न काहीअंशी सोडविण्यास मदत झाली आहे.
मोरासाठी ही गावे ओळखली जातात. त्यामुळे या गावांना पर्यटनासाठीची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. वडनेर भैरव गाव द्राक्ष (Grapes) व टोमॅटो (Tomato) या पिकांसाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, गावाच्या उत्तरेला लोधाईमाता टेकडीवर काशी विश्वेश्वर गोरक्षनाथ मंदिर आणि अनेक परिवारांचे श्रद्धास्थान असलेली लोधाई मातेची मंदिरे आहेत. मंदिर परिसरात शेकडो मोरांचा अधिवास आहे. या सर्व मोरांना येथील शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची भीती नसल्याने द्राक्षबागांमध्ये सुद्धा मोरांचे थवे मनसोक्त फिरताना दिसतात. पण, सध्याच्या परिस्थितीत क्षेत्राभोवती मालकी क्षेत्रात द्राक्षबागा असल्याने मोरांच्या मागे कुत्रे लागले तर द्राक्ष बागेतील ड्रिपच्या नळ्यांमुळे मोरांना पळता येत नाही. यामुळे पाण्याच्या शोधात आलेल्या मोरांचा जीव धोक्यात येतो.
मात्र, वन समिती विभाग व वडनेर भैरव वनपरीमंडळातील वन कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने पाणवठे तयार करून त्यात टँकरने पाणी टाकले. त्यामुळे आजपर्यंत एकाही मोराचा उष्माघाताने अथवा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेला नाही. वर्षभरात मोर व इतर पशु पाण्यासाठी शेती क्षेत्राकडे गेलेले नाहीत.
चांदवड वन विभागाचे अधिकारी संजय वाघमारे, वडनेर भैरव वन परिमंडळ अधिकारी देविदास चौधरी, वनरक्षक विजय टेकणर, वनमजूर वसंत देवरे, अशोक शिंदे, सुरेश सलादे, दत्ता शिंदे, सोमनाथ निफाडे यांनी स्वखर्चाने कृत्रिम पाणवठ्यात पाणी टाकले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.