LPG Crisis: लासलगावमध्ये सिलिंडरचा कृत्रिम तुटवडा! हॉटेल व्यावसायिकांना तत्काळ मिळत असल्याचा ग्राहकांचा आरोप

gas cylinder
gas cylinderesakal
Updated on

LPG Crisis : ऐन सणासुदीच्या दिवसांत लासलगाव व परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून, बुकिंग केल्यानंतरही सिलिंडर वेळेत मिळत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

सिलिंडर मिळविण्यासाठी येथील जाधव गॅस एजन्सीच्या वितरकांकडे चकरा माराव्या लागत आहेत. नोंदणी केल्यानंतरही अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत आहेत.

हेच सिलिंडर हॉटेल व्यवसायिकांनी मागणी केल्यानंतर त्यांना तत्काळ मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (Artificial shortage of cylinders in Lasalgaon Customers allege that hoteliers getting immediate LPG Cylinders nashik)

केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरवर सबसिडी देत दर कमी केले, तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ केल्यामुळे परिसरातील हॉटेल व्यवसायिकांनी घरगुती गॅस सिलिंडरवर आपला मोर्चा वळवल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

एक महिन्यापासून लासलगाव व परिसरात ही समस्या भेडसावत असून, नागरिकांनी सिलिंडरसाठी विचारणा केली असता, संबंधित एजन्सीकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली जात आहेत.

लासलगाव व परिसरातील ग्राहकांना येथील जाधव गॅस एजन्सीमार्फत सिलिंडरचा पुरवठा केला जातो. मात्र, एक महिन्यापासून ऑनलाइन नोंदणी करूनही एजन्सीकडून वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

gas cylinder
NMC News : अदलाबदलीच्या खेळात अर्थकारण रंगले; दोन कार्यकारी अभियंत्यांकडे प्रत्येकी दोन विभागांचा पदभार

सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सिलिंडरची नोंदणी केल्यावर त्याचा पुरवठा होण्यासाठी मोठा कालावधी लागत असल्याचा आरोप करत तातडीने हा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

"गेल्या काही आठवड्यापासून घरगुती सिलिंडा नोंदणी केल्यानंतरही पुरवठा एजन्सीकडून वेळेवर होत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हॉटेल व्यवसायिकांनी मागणी केल्यावर त्यांना तत्काळ मिळते. मात्र, घरगुती गॅसधारकांनी मागणी केल्यास त्यांना टाळाटाळ केली जाते, असा दुजाभाव भाव का?"-महेश बाफना, रहिवासी लासलगाव

"सध्या कंपनीमधूनच अनियमित पुरवठा होत आहे. जळगाव येथील युनिटमध्ये प्रॉब्लेम आहे. त्याचा जादा लोड सिन्नर युनिटवर आल्याने पुरवठा करताना अडचणी येत आहेत. काही दिवसांतच ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच सिलिंडरचा पुरवठा होईल."

-जयवंत जाधव, संचालक, जाधव गॅस एजन्सी, लासलगाव

gas cylinder
Dr. Bharati Pawar News: निफाड ड्रायपोर्टसाठी 108 कोटींचा पहिला हप्ता जमा! मंत्री डॉ. पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()