Nashik Temperature Rise : कृत्रिम पाणवठे ठरताहेत वन्यप्राण्यांसाठी लाभदायक!

Artificial water bodies
Artificial water bodiesesakal
Updated on

Nashik News : दिवसागणिक वातावरणात होणारा बदल तसेच तीव्र उन्हाचा पारा वाढल्याने तालुक्यातील बहुतांश भागात पाण्याचे स्रोत कोरडे पडले आहेत. तर वनपरिक्षेत्रातील कृत्रिम बनविलेली पाणवठे (वाॅटर होल) वन्यप्राण्यांसाठी वरदान ठरत आहेत. (Artificial water bodies are beneficial for wildlife in heat rise nashik news)

वनविभागाकडून जंगल क्षेत्रात बहुतांश ठिकाणी कृत्रिम पाणवठे निर्माण करण्यात आली आहेत. पाणवठे टॅकरच्या माध्यमातून पाणी आणून वनपरिक्षेत्रातील बनविलेल्या कृत्रिम पाणवठे पाण्याने भरल्यामुळे वन्यप्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोतही आटतात. त्यामुळे याची दखल घेत वनविभागाने जंगलात वन्य प्राण्यांसाठी छोटीमोठी पानवठे तयार करून त्यात पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. त्यामुळेच काही प्रमाणात वन्य प्राण्यांची भटकंती थांबण्यास मदत होणार आहे. यापूर्वी पाण्याच्या शोधार्थ शेतातील गावालगत येणा-या हरणांसह इतर वन्यप्राण्यांमुळे नुकसानीच्या घटना घडल्या आहेत.

जंगलात पाणी कुठेही मिळाले नाही तर जंगली श्वापदे जंगल सोडून गावकुसाबाहेर भटकंती करताना आढळून येतात. येथील जंगलात चिंकारा, मोर, बिबट, रानडुक्कर, वानर, ससे, कोल्हे, लांडगे, तरस, साळींदर, उदमांजर आदि वन्यजीव प्रजातींचा वावर आहे. वन्यप्राण्यांची उन्हाळ्यात होणारी भटकंती थांबवण्यासाठी वनविभागाकडून दरवर्षी उपाययोजना केल्या जातात.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Artificial water bodies
Positive News : रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; रिक्षात राहिलेला बाजार केला घरपोच

मागील वर्षी मालेगावचे वनपरिक्षेत्र तब्बल ३३००० हेक्टरवर पसरले असून कक्राळे येथील जंगलात दोन कृत्रिम पाणवठे, निंबायती येथे चार, दहिदी येथे दोन तर पोहाणे येथील जंगलात दोन पानवठे तयार करण्यात आले होते तर सटाणा वनपरिक्षेत्र २१२५३.५६ हेक्टरवर असून मागील काळात वनपरिक्षेत्रात आठ कृत्रिम पाणवठे निर्माण करण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

सन २०२२ - २३ मधील पाणवठे 

सटाणा :- भौगोलिक क्षेत्र २१२५३.५६

पानवठे :- क-हे = कोळीपाडा - २, दोधेश्वर - २, ईउपखेडा = फोपीर - २, रातीर - ४, आव्हाटी = तरसाळी - २, केरसाणे - २, डांगसौंदाणे = दहिंदूले - १.  

मालेगाव :- भौगोलिक क्षेत्र ३३००० 

पानवठे :- कक्राळे - २, नरडाणे - २, नागझरी - २, विराणे - २, चिंचगव्हाण - २. 

"पाणवठ्यांमुळे वन्यप्राणी विहिरीत पडून मृत्युमुखी होण्याच्या घटना कमी झाल्या आहेत. पावसाळा सुरू होईपर्यंत पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन आहे."- वैभव हिरे, वनपरिक्षेत्र आधिकारी मालेगाव.

"ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे निर्माण करण्यात आली असून त्याद्वारे वन्यजीवांची तहान कशी भागेल यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पाणवठ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीने टॅकरव्दारे पाणी घेऊन वन्यप्राण्यांकरिता कृत्रिम पाणवठे भरले जातात." -प्रशांत खैरनार, वनपरिक्षेत्र आधिकारी सटाणा.

Artificial water bodies
Positive News : व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कुटुंबाला आर्थिक मदत; सामाजिक बांधिलकीची कृतिशीलता समाजासमोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.