1500 कलावंतांना दिले जाणार मानधन; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

artists
artistsesakal
Updated on

नाशिक : कोरोनामुळे (Corona) सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असल्याने अनेक कलाकारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. कलांवतांवर आलेले संकट बघता सरकारने कलावंतांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. या आर्थिक मदतीसाठी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची कलावंतांना मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत १० फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली असून, वाढीव मुदतीच्या आत कलावंतांनी अर्ज भरून आर्थिक मदतीचा लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून करण्यात आले आहे.

दोन वर्षात आर्थिक संकटात सापडलेल्या लोककलावंतांना काहीसा आर्थिक आधार मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, जिल्ह्यात जवळपास एक हजार पाचशे कलावंतांना मानधन मिळणार आहे. यात शाहिरी, तमाशा फड, ऑर्केस्ट्रा, नाट्यकलावंत, नाट्यपथक आदी कलांवतांना मानधन दिले जाणार आहे. या आर्थिक मानधन कलावंतांच्या निवडीसाठी जिल्हास्तरावर समिती गठित करण्यात आली आहे. दरम्यान, वृद्ध कलावंतांचेही अर्ज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून मागविण्यात आले आहे. यात जिल्हाभरातून जवळपास ४५० अर्ज आल्याची माहिती प्रमुख कार्यवाह सुनिल ढगे यांनी दिली आहे.

artists
Hypoglycemia : मधुमेह नसेल तरी कमी होते Blood sugar, जाणून घ्या लक्षणे
artists
आता RTO मध्ये जाऊन Driving Licence Test देण्याची गरज नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()