Nashik Kaka Katta: वास्तववादी चित्रकलेतील मर्म उलगडणारे कलाकार : बबन जाधव

Baban Jadhav
Baban Jadhavesakal
Updated on

"प्रत्येक चित्रकाराला हातात ब्रश आणि पेन्सिल धरता येतात, काहींना ते चालवता येतात, काहींना त्यातून रेखाटने गवसते, तर काही मोजके चित्रसाधक असे असतात की त्यांना त्यात दडलेल्या कला चैतन्याशी संवाद साधता येतो. अशा मोजक्या चित्रसाधकांपैकी एक म्हणजे नाशिकमधील ज्येष्ठ व गुणी चित्रकार बबन जाधव. ‘सकाळ’ वाचकांशी संवाद साधताना ते म्हणतात, कुठल्याही कलेचा गाभा हा चैतन्य हाच असतो, चित्रकलाही याला अपवाद नाही. चित्रातले चैतन्य अनुभवण्याचा हा गाभा साध्या रेषेपासून सुरू होतो. माणसाच्या आयुष्यात एकदा का ही ‘रेषा’ आली की त्याला त्या रेषेतून ‘दिशा’ कळू लागते आणि मग त्या माणसातला कलाकार घडू लागतो. रेषा, दिशा आणि आकृती ही कला घडविणारी बाह्य माध्यमे आहेत, या माध्यमांना साधनेचे वळण असेल तर कलाकाराचे जीवन लयदार होत जाते."- तृप्ती चावरे-तिजारे.

(Artists Unraveling the Essence of Realist Painting Baban Jadhav Nashik Kaka Katta)

तिबेटमधील एक म्हण आहे, माणसांमधील सर्जनशीलता ही त्याच्या मनातील अराजकाला दूर करते. बबन सरांच्या चित्रांकडे बघून पहिली भावना हीच तयार होते. प्रत्येकाच्या मनात काहीतरी अराजक सुरूच असते, ते अराजक घेऊनच आपण चित्रकृतीकडे बघतो.

बबन सरांचे चित्र बघता, बघता मात्र मनावरील जळमट दूर होतात आणि अव्यक्त असे अराजक बाजूला पडून सर्जनशीलतेचे सहज दर्शन होते. चित्रकलेचा वारसा त्यांना त्यांचे वडील संतू जाधव आणि थोरले बंधू अरुण जाधव यांच्याकडून मिळाला.

चित्रकला महाविद्यालय नाशिक येथून शिक्षण सुरू करून १९८३ मध्ये जी. डी. आर्टमधून ते रंगकला व रेखाकला या परीक्षांमध्ये विशेष प्रतिभा दाखवीत उत्तीर्ण झाले. वास्तववादी शैली, व्यक्तिचित्रण व जलरंगात काम करीत असताना त्यांनी रचनाशास्त्रावर प्रबंधही सादर केला.

चित्रकलेत तंत्र हे माध्यम असून कला हे साध्य आहे हे तत्त्व वेळीच ओळखल्याने त्यांच्या आतमधला भाव हा त्यांच्या चित्रांशी बोलू लागला. माणूस जसा आतून असतो, तशीच त्याची कला बाहेरून दिसते.

याचा परिणाम म्हणून, पडक्या घराला सावरणाऱ्या सावल्या यासारखा संवेदनशील विषय सरांच्या चित्रकृतीतून जिवंतपणे व्यक्त होताना दिसतो. त्यांच्या तरल व निर्मळ मनाचेच जणू ते प्रतीक असते.

चित्रकला ही त्यांच्यात उपजतच होती, पण त्यांच्यातला चित्रकार मात्र त्यांना शोधावा लागला आणि एक दिवस त्यांनाच तो गवसला. पुढे कष्टसाध्य मेहनतीने त्यांनी तो घडवतही नेला. चित्रकलेची ऊर्मी हीच जीवनाची दिशा ठरली.

त्या दिशेने अभ्यास, अनुभव, कल्पकता व प्रतिभा या गुणांनूतच चित्रकला हेच जीवन होत गेले. निसर्गाची गूढता, व्यक्तिदर्शन, भावदर्शन, रंगशैली तसेच चित्रशास्त्राचे अनेक पैलू अभ्यासताना चित्रकला हा आत्मिक आनंद देणारा राजमार्ग आहे हे सत्य त्यांच्या हाती आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Baban Jadhav
Nashik kala katta : मनस्वी कलासाधक केशव कासार

या समाधानातून ते म्हणतात, कला साकार करीत असताना कुठे थांबायचे, हे समजले पाहिजे. प्रमाणबद्धतेचा वापर कसा करायचा हे समजले तर थांबण्याचा योग्य क्षणही समजतो.

एखाद्या गायकाचा एखादाच सूर जर नेमका आणि प्रकाशमान लागला तर पुढे त्याला तान गायची गरज नसते, त्याचप्रमाणे चित्रकाराला काय सांगायचे आहे ते एकदा सांगून झाले की पुढे ब्रश आणि रंग खाली ठेवण्यातच औचित्य आहे.

चित्र साकारण्याच्या पहिल्या क्षणापासूनच समाधी अवस्थेत प्रवेश होत असतो. कलेच्या समृद्ध दालनामध्ये चैतन्याचे अस्तित्व दिसू लागते आणि तेच हातातूनही साकारत असते. त्यासाठी कलेत तल्लीन व्हावे लागते.

तल्लीन होणे म्हणजे चैतन्य समजणे, चित्रातला सूर समजणे चित्रातील लय समजणे. पिकासो, व्हॅन गॉग, रझा, हुसेन अशा थोर चित्रकारांना आदर्श मानणारे बबन सर औचित्य व सौंदर्य या कला मूल्यांचा कसा विचार करतात, ते लेखाच्या पुढील भागात.

Baban Jadhav
Nashik Kala Katta: रंगभूमीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या चतुरस्र अभिनेत्री : विद्या करंजीकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.