Nashik Bazar Samiti : राज्याचे सहसचिव डॉ. सुप्रिय धपाटे यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने सचिव अरुण काळे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव वादग्रस्त अरुण काळे यांची खातेनिहाय चौकशी होऊपावतो अखेर निलंबित करण्यात आले आहे. आता सचिव पदाची धुरा ही सहाय्यक सचिव प्रकाश घोलप यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कार्यरत सचिव अरुण काळे यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पदावरून निलंबन करण्यात आल्याचा आदेश नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने सभापती देवीदास पिंगळे यांनी काढले आहेत. (Arun Kale secretary of market committee was suspended nashik news)
नाशिक जिल्ह्यातील १९८ शेतकऱ्यांची टोमॅटो खरेदी प्रकरणात झालेली फसवणुकीबाबत तेथील कार्यरत सचिव अरुण काळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा सादर करण्याबाबत सूचित केले होते.
नाशिक कृषी उत्पन्न बाजारमधील तत्कालीन संचालक शंकरराव धनवटे यांनी दिलेल्या तक्रार अर्जावर तत्कालीन मंत्री पणन यांनी काळे यांच्या भ्रष्ट व गैरकारभाराची सखोल चौकशी होऊन कायदेशीर कारवाईबाबत निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला अहवाल सादर करण्याबाबत निर्देश तत्कालीन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (नाशिक) यांनी दिले होते.
परंतु नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही, ही बाब गंभीर आहे. त्याचप्रमाणे काळे, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी सादर केलेला खुलासा शासनस्तरावरून अमान्य करण्यात आलेला आहे.
त्यामुळे तत्काळ निलंबित करण्यात यावे व खातेनिहाय निष्पक्ष चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, असे आदेशात म्हटले होते. त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे यांनी खातेनिहाय चौकशी होईपावतो निलंबित करण्याचे आदेश पारित केले आहेत.
"बाजार समिती ही शेतकऱ्यांची आहे. सचिवाने कामकाज बघत असताना शेतकऱ्याचे हित लक्षात घेत बाजार समितीहिताचे काम करणे अपेक्षित असते. परंतु काळे यांनी गंभीर स्वरूपाच्या चुका केल्याने ते कारवाई पात्र झाले आहेत. तसेच शेतकरी, माजी संचालक यांनीदेखील तक्रारी केल्या होत्या. राज्य शासनाने कारवाई करण्याचे आदेश केले होते. त्याचप्रमाणे झालेल्या वार्षिक सभेत ठरावदेखील संमत करण्यात आला आहे." - देवीदास पिंगळे, कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.