Nashik News: औष्णिक केंद्राच्या राखेने 5 किलोमीटर परीघ बाधित; आरोग्याच्या समस्या, शेतमालाचे नुकसान

Ash from thermal center affected radius of 5 km nashik news
Ash from thermal center affected radius of 5 km nashik newsesakal
Updated on

Nashik News: पाणीटंचाई व मालाला भाव मिळत नसल्याने बेजार झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आता नव्या समस्येला सामोरे जावे लागतं आहे. एकलहरे औष्णिक वीज केंद्रातून मोठ्या प्रमाणात राखेचे कण बाहेर पडत असल्याने केंद्रापासून पाच किलोमीटरचा परीघ बाधित झाला आहे.

आरोग्याच्या समस्येबरोबरच शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे स्थानिक शेतकऱ्यांनी तक्रार दिली आहे. (Ash from thermal center affected radius of 5 km nashik news)

महापालिका हद्दीतील नांदूर, मानूर, दसक- पंचक व तालुक्यात येणाऱ्या ओढा, शिलापूर माडसांगवी गावातील नागरिकांना सध्या नव्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. एकलहरे औष्णिक वीज केंद्रातून बाहेर पडणारी राख वातावरणात मिसळत असल्याने नागरिकांना श्वसनासंदर्भातील आजाराला सामोरे जावे लागत आहे.

त्याचबरोबर शेतीचे मोठे नुकसान होत आहे. शेती करताना अडचण निर्माण होत आहे. हवा प्रदूषित झाली आहे. शेतमालावर राखेचे कण बसत असल्याने पाण्याचा अतिरिक्त फवारा मारावा लागत असून, त्यातून पिकाचे नुकसान होत असल्याचा दावा करताना शेतकऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रार केली आहे.

Ash from thermal center affected radius of 5 km nashik news
Nashik News: प्रभाग 7 मध्ये दिवाळीपूर्वीच राजकीय फटाके; तलावाच्या दुरवस्थेवरून राष्ट्रवादी भाजप शिंदे सेना संघर्ष

सात ते आठ वर्षांपूर्वी अशाच प्रकारचा त्रास होत होता. वारंवार तक्रार केल्यानंतर राख बंद झाली. आता पुन्हा त्रास सुरू झाला आहे, असे निवेदन माजी नगरसेवक उद्धव निमसे, रहिवासी रवींद्र निमसे, संपत माळोदे, सोमनाथ हांबरे, श्याम अनवट, बाळासाहेब आहेर, शंकर हांबरे, उत्तम निमसे, शिवराम हांबरे यांनी निवदेन दिले.

"सात-आठ वर्षांपूर्वी राखेच्या कणांचा त्रास होता. आता पुन्हा त्रास सुरू झाला आहे. यामुळे आरोग्याच्या समस्येबरोबरच शेतीचे नुकसान होत आहे. तातडीने बंदोबस्त करावा." - उद्धव निमसे, माजी नगरसेवक.

Ash from thermal center affected radius of 5 km nashik news
Nashik Citylinc Protest: सिटलिंक कर्मचारी संपाच्या तयारीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.