Nashik Agitation News: आशा सेविका, मदतनीस 4 डिसेंबरपासून पुन्हा संपावर!

Strike
Strikeesakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यातर्फे मानधनवाढीसह विविध मागण्यांसाठी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी ऑनलाइन कामावर बहिष्कार घातला. संपाची नोटीस गेल्यापासून मासिक अहवालावर व मासिक बैठकीवर बहिष्कार घालत असल्याबद्दल शासनाला सूचना देण्यात आली आहे.

कोणत्याही प्रकारची माहिती प्रशासनाला मोबाईलवर पाठवू नये, असे आवाहन सर्व कर्मचाऱ्यांना करण्यात येत आहे. (Asha Sevika Helpers on strike again from December 4 Nashik Agitation News)

११ डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.

ग्रॅच्युईटीबाबत न्यायालयाच्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना किमान १८ हजार ते २६ हजारांपर्यंत मानधन वाढ करावी, ती महागाई निर्देशांकाला जोडून त्यात वाढ करावी,

दोन डिसेंबरपर्यंत आमदाराच्या घरावर मोर्चे काढून दिवाळी सत्रात प्रश्न विचारण्याची विनंती करण्यात येईल, आहाराचा दर आठ रुपये असल्याने कुपोषण निर्मूलन होण्याऐवजी त्यात वाढ होत आहे.

Strike
Nashik Unseasonal Rain Damage: नांदगाव तालुक्यात गारपिटीचा दणका! 40 हून अधिक गावात मालमत्तेसह चारा, पिकांची हानी

तरी हा दर सर्वसाधारण बालकाला १६ रुपये व अति कुपोषित बालकाला २४ रुपये असा करण्यात यावा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारे वेतनश्रेणी, भविष्यनिर्वाह निधी, सामाजिक सुरक्षांचा लाभ देण्यात यावा.

सेवा समाप्तीनंतर मृत सेविका मदतनिसांना एकरकमी लाभ त्वरित देण्यात यावा आदी मागण्यांसाठी बेमुदत संप करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक फेडरेशन सीटू संलग्नच्या सरचिटणीस कल्पना शिंदे यांनी दिली.

Strike
Nashik Unseasonal Rain Damage: अवकाळीच्या तडाख्याने शेतकरी पुन्हा उद्वस्त; बागलाणमध्ये हजार हेक्टरवरील द्राक्षाला फटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()