ASHA Worker Protest : आशा, गटप्रवर्तकांचा आझाद मैदानावर ठिय्या

शासनाने केलेल्या घोषणाची अंमलबजावणी करा, शासन निर्णय घ्या, त्यासाठी राज्यातील आशा व गटप्रवर्तक यांनी शहापूर ते मुंबई लाँग मार्च काढला होता.
Asha and group promoters during the protest at Azad Maidan.
Asha and group promoters during the protest at Azad Maidan.esakal
Updated on

ASHA Worker Protest : शासनाने केलेल्या घोषणाची अंमलबजावणी करा, शासन निर्णय घ्या, त्यासाठी राज्यातील आशा व गटप्रवर्तक यांनी शहापूर ते मुंबई लाँग मार्च काढला होता.

ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन दोन दिवस महामुक्काम आंदोलन केले. (Asha worker and group promoters protest on Azad Maidan nashik news)

मुख्यमंत्री शिंदे यांनी येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, कार्यवाही होत नसल्याने आशा व गटप्रवर्तकांनी मुंबईतील आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शासन आदेश काढेपर्यंत हा ठिय्या कायम राहणार असल्याचे महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचे राज्य अध्यक्ष राजू देसले यांनी सांगितले.

आशा व गटप्रवर्तकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत तीन महिन्यांपूर्वी आरोग्यमंत्री व मुख्यमंत्री यांनी आशा यांना सात हजार, तर गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये, तसेच दोन हजार दीपावली भेट, गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा देण्यासंदर्भात लेखी आश्वासन दिले होते. मात्र तीन महिने उलटूनही शासन निर्णय काढण्यात आला नाही.

Asha and group promoters during the protest at Azad Maidan.
ASHA Workers Strike: आशा सेविकांचं राज्यव्यापी आंदोलन, चटणी भाकरी खाऊन नोंदवला निषेध

यासाठी १२ जानेवारीपासून राज्यव्यापी संप सुरू केला आहे. कोरोनाकाळात जिवाची बाजी लावून काम करणाऱ्या आरोग्य खात्यातील आशा, गटप्रवर्तक मात्र सरकारच्या शासन निर्णयाची वाट पाहत आहे. ९ फेब्रुवारीला मुख्यमंत्री शिंदे यांनी वीस मिनीट महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक प्रतिसमितीची बैठक घेतली. बैठकीमध्ये मुख्यमंत्री यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगितले.

मात्र अद्यापही निर्णय न झाल्याने आशा व गटप्रवर्तक अत्यंत संतापलेल्या आहेत. तीन महिन्यांपूर्वी आंदोलन केले तेव्हा सरकारच्या शब्दावर घोषणेवर विश्वास ठेवला. परंतु तीन महिने उलटून गेले तरी अद्यापही शासनाने परिपत्रक काढले नाहीत. जोपर्यंत शासन निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार.

ज्या दिवशी शासन निर्णय आमच्या हातात मिळेल त्या दिवशी आम्ही माघार घेऊन घरी जाणार, अशी भूमिका घेत आझाद मैदान मुंबई येथे हजारोंच्या संख्येने आशा व गटप्रवर्तक आंदोलन करत आहेत. आंदोलनाचे नेतृत्व कृती समितीचे राजू देसले, आर. मायती इराणी, एम. ए. पाटील, उज्‍ज्वला पडलवर, सुमन पुजारी, विनोद झोडगे, आनंदी अवघडे, हनुमंत कोळी, मुगाजी बुरूड, सचिन आंदले, शबाना शेख करत आहेत. नाशिक जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक यांचाही यात समावेश आहे.

Asha and group promoters during the protest at Azad Maidan.
Asha Workers Protest: सरकारने कंत्राटी कर्मचारी दर्जांबाबत निर्णय घ्यावा; झिरवाळ यांच्या सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.