Nashik Bus Accident News : मोलमजुरीतून सुरू असलेल्या सुखी संसारावर काळाचा घाला

dead Ashabai Patil
dead Ashabai Patil esakal
Updated on

Nashik Bus Accident News : सप्तशृंगगडावर बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात मुडी (ता. अमळनेर) येथील आशाबाई राजेंद्र पाटील या मृत्युमुखी पडल्या. मुडी येथीलच अन्य बारा भाविक यात जखमी झाले आहेत.

आशाबाई या मोलमजुरी करून पतीला मदत करीत संसाराचा गाडा हाकत होत्या. त्यांच्या अकाली जाण्याने कुटूंब उघड्यावर पडले आहे. (Ashabai Patil died in bus accident at Saptshringgad nashik bus accident news)

रविवारी (ता.९) सकाळी साडेसातला मुडी येथून देवदर्शनासाठी सोनगीर- धुळे बसने हे सर्व निघाले. धुळ्याहून विनाथांबा बसने सर्वजण पंढरपूरला पोहोचले. पांडुरंगाचे दर्शन घेऊन सर्वांनी तेथेच मुक्काम केला. या समूहातील ६ महिला तुळजापूरला दर्शनासाठी गेल्या तर उर्वरित १४ महिला व २ पुरुष हे विविध ठिकाणी दर्शन घेत शिर्डीला पोहोचले.

शिर्डीच्या दर्शन रांगेत पुन्हा सर्वांचीच भेट झाली. साईबाबांचे दर्शन घेऊन सर्वजण शनिशिंगणापूरात पोहोचले. तेथील दर्शन आटोपून शनिशिंगणापूरहून रात्री धुळे बसस्थानकावर पोहचले. सर्वांनी बसस्थानकावर मुक्काम केला. त्यातील ६ महिला गावी परतल्या तर उर्वरित १४ महिला २ पुरुष सप्तशृंगगडावर मंगळवारी (ता.११) खामगाव आगाराच्या बसनेच गडावर पोहोचले.

मंगळवारी सायंकाळीच दर्शन घेऊन त्यांनी गडावर मुक्काम केला. बुधवारी (ता.१२) सकाळी साडेसहाला गडावरून परतीच्या प्रवासाला सुरवात केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

dead Ashabai Patil
Nashik ST Bus Accident : नाशिकमध्ये २४ प्रवाशांसह एसटी दरीत कोसळली! कंडक्टरचा व्हिडीओ आला समोर

खामगाव बसने सप्तश्रृंगगड घाट परिसरातील गणपती टप्प्यावरुन घाट रस्त्यालगतचा कठडा तोडला अन् बस दरीत कोसळत मोठा अपघात झाला. त्यात आशाबाई राजेंद्र पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

आशाबाई गरीब कुटुंबातील असून त्यांचे पती राजेंद्र पाटील हे गावात मजुरी करतात. आशाबाई स्वतः मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. त्यांना एक मुलगी व एक मुलगा असून मुलीचे लग्न झाले आहे. मुलगा खासगी कंपनीत काम करतोय. अशा परिस्थितीत काळाने त्यांच्यावर केलेल्या या आघाताने परिवाराचे मोठे नुकसान झाले आहे.

बहिणी गंभीर जखमी

अपघातात मृत झालेल्या आशाबाई राजेंद्र पाटील यांच्यासोबत या प्रवासात त्यांच्या मोठ्या बहिण वत्सला साहेबराव पाटील (रा. कलमाडी, ता. जि. नंदुरबार) सोबत होती. त्यादेखील या अपघातात गंभीररीत्या जखमी झाल्या. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र, काळाने त्या दोन्ही बहिणींच्या नात्यातील वीण तोडली.

dead Ashabai Patil
Nashik Bus Accident : सप्तश्रृंगी घाटात भीषण अपघात; मृत महिलेच्या वारसाला मिळणार दहा लाख, CM शिंदेंची घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.