Ashadhi Ekadashi Bakri Eid: शहरात राष्ट्रीय एकात्मतेचा नवा अध्याय! संगमेश्‍वरात आषाढी एकादशीला कुर्बानी नाही

District Superintendent of Police Shahaji Umap welcoming MLA Maulana Mufti Mohammad Ismail at the Peace Committee meeting in Malegaon.
District Superintendent of Police Shahaji Umap welcoming MLA Maulana Mufti Mohammad Ismail at the Peace Committee meeting in Malegaon.esakal
Updated on

Ashadhi Bakri Eid 2023 : राज्यात वातावरण कलुषीत करण्याचा प्रयत्न हाेत असताना गेली दोन दशके शांततेची कुस धरलेल्या शहराने राष्ट्रीय एकात्मतेचा नवा अध्याय लिहिला आहे.

औरंगाबाद जिल्ह्याच्या पाठोपाठ शहरातील हिंदू-मुस्लीम संमिश्र भाग असलेल्या संगमेश्वरात "आषाढी एकादशी" ला कुर्बानी देणार नाही. हा निर्णय येथील शांतता समितीच्या बैठकीत एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी जाहीर केला.

नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या उपस्थितीत झालेल्या या निर्णयाचे सर्वदूर स्वागत होत आहे. (Ashadhi Bakri Eid 2023 New Chapter of National Unity in malegaon no Qurbani on Ashadhi Ekadashi in Sangameshwar nashik news)

येथील सुसंवाद हॉलमध्ये सोमवारी (ता.२६) सायंकाळी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी श्री. शेखर म्हणाले की, सोशल मीडियाचा अतिवापर विघातक आहे. त्याचा दुरुपयोग होता कामा नये. सोशल मिडीयावर चुकीचे व तणाव निर्माण करणाऱ्या संदेशांचे सायबर गुन्हे शाखेकडे नोंद आहे.

सोशल मिडीया वापरणाऱ्यांनी चुकीचे मेसेज पाठवू नयेत असे आवाहन त्यांनी केले. श्री. उमाप यांनी शहरातील शांतता, सामाजिक सलोखा कायम ठेवा. प्रशासनाला कायदा, सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल म्हणाले, की संगमेश्‍वर भागातील सर्व मुस्लीम बांधवांनी आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शहरातून वेगळा संदेश जाईल. वीज वितरण कंपनीचे मुख्य व्यवस्थापक यांच्यासोबत बैठक झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

District Superintendent of Police Shahaji Umap welcoming MLA Maulana Mufti Mohammad Ismail at the Peace Committee meeting in Malegaon.
Ashadhi Ekadashi Bakri Eid: ‘ईश्वर अल्ला तेरो नाम सबको संमती दे भगवान' आषाढी-बकरी ईदचे जपले धार्मिक पावित्र्य!

संबंधित अधिकारी गोड बोलून वेळ मारुन नेतात. शहरात खासगी वीज कंपनी आल्यापासून भारनियमन वाढले आहे. नागरिकांमध्ये कंपनीच्या कारभारा विरोधात जनआक्रोश आहे. बकरी ईद साजरी झाल्यानंतर जनआंदोलन करु, असा इशारा त्यांनी दिला.

बैठकीस अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, महानगरपालिका आयुक्त भालचंद्र गाेसावी, प्रांताधिकारी नितीन सदगीर, सहाय्यक पोलिस अधिक्षक तेगबीरसिंह संधू, तहसीलदार नितीन देवरे, उपअधिक्षक प्रदीप जाधव,

वीज वितरण कंपनीचे मुख्य व्यवस्थापक प्रेमसिंग, महावितरणचे जगदीश इंगळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जावीद खाटीक, शांतता समितीचे सदस्य केवळ हिरे, मधुकर केदारे, बशीर शेख, इफ्तेखार पहिलवान, हरिप्रसाद गुप्ता, कैलास शर्मा आदी उपस्थित होते.

District Superintendent of Police Shahaji Umap welcoming MLA Maulana Mufti Mohammad Ismail at the Peace Committee meeting in Malegaon.
Ashadhi Ekadashi 2024 : रूक्मिणी रूसली अन् द्वारकाधीश श्रीकृष्ण पंढरीनगरीत येऊन पांडुरंग झाले!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.