Ashadhi Ekadashi Art : तुळस हे एक औषधी रोपटे आहे. दिसायला साधारण असलेली तुळस सर्वगुणसंपन्न असते. आजीच्या बटव्यातील काढ्यात तुळशीला अनन्यसाधारण महत्व होते.
चोपडा येथील कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी आषाढी एकादशीनिमित्त छोट्याशा तुळशी पत्रावर ऍक्रेलिक कलरच्या सहाय्याने मायबाप विठ्ठलाचे चित्र व पांडुरंग हे अक्षरचित्र साकारले असून त्यांच्या या कलाकृतीचे आज राज्यभरात सोशल माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. (Ashadhi Ekadashi 2023 Vitthal painting made on tushi Patra Artwork by art teacher Rakesh Vispute from Jalgaon nashik)
ग्रामीण संस्कृतीत प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन असते. वारकरी संप्रदायात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या वारीला जाताना प्रत्येक वारकरी स्त्रीच्या डोक्यावर तुळशी वृंदावन दिसतेच. म्हणून तिला देवत्व बहाल केले. तुळस बहुगुणी आहे. ती भोवतालची हवा शुद्ध करते.
खोकला, सर्दी, ताप या आजारावर तुळस गुणकारी आहे. त्वचा रोग, दंत रोग यावरील रामबाण उपाय आहे. एखाद्या शुभप्रसंगी सर्वत्र तुळशीपत्राने जल शिंपडून पावित्र्य निर्माण केले जाते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कृतिशील शिक्षक महाराष्ट्रचे सदस्य व चोपडा येथील विवेकानंद विद्यालयाचे तंत्रस्नेही कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी आषाढी एकादशीनिमित्त चक्क छोट्याशा तुळशी पत्रावर ऍक्रेलिक कलरच्या सहाय्याने तीस मिनिटात अवघ्या वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत मायबाप विठ्ठलाचे चित्र व पांडुरंग हे अक्षरचित्र साकारले त्यांच्या या नावीन्यपूर्ण कल्पकतेचे सर्वत्र सोशल माध्यमातून कौतुक होत आहे.
आज दिवसभरात मोठ्या महाराष्ट्रातील लाखो व्यक्तींनी या कलाकृतीचे स्टेटस ठेवलेले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.