Ashadhi Bakri Eid: गोदाकाठी हिंदू-मुस्लीमांचा भक्तिमय संगम! एका बाजूला भजन तर दुसऱ्या बाजूला होतेय अजान

Mandir and Masjid
Mandir and Masjidesakal
Updated on

Ashadhi Bakri Eid : आजही धर्मांध भिंती पलिकडून एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे, एकमेकांच्या धार्मिक अधिष्ठानाप्रती आस्था बाळगणारे अनेक लोक आपणाला आढळतात. त्यातीलच एक ठिकाण म्हणजे ऐतिहासिक गाव असलेले चांदोरी.

अजान व भजन दोन्ही समुदायातील नागरिक तितक्याच श्रद्धेने करतात. ही या गावाची भक्तिमय ओळख आहे. (Ashadhi ekadashi Bakri Eid 2023 Devotional confluence of Bhajan Azan performed at chandori nashik news)

बकरी ईद व आषाढी एकादशी हे सण हिंदू व मुस्लीम या समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे सण. हे सण दोन्ही समाजात वेगवेगळ्या रूढी, परंपरा पाळत साजरे केले जातात.

चांदोरी येथे दोन्ही समाजांचे लोक अत्यंत प्रेम आणि श्रद्धेने एकमेकांच्या रूढी-परंपरांचा आदर करत गुण्यागोविंदाने एकत्रितपणे साजरे करतात.

आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद आल्याने महाराष्ट्रात सर्वप्रथम बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न देता फक्त नमाज पढत दुसऱ्या दिवशी कुर्बानी देण्याचा निर्णय चांदोरी येथील मुस्लिम बांधवांनी घेतला.

काही स्वार्थी लोक केवळ स्वार्थ साधण्यासाठी समाजामध्ये तेढ निर्माण करत असतात. हिंदू- मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणारे आपण अनेकजण पाहतो. मात्र या सर्व गोष्टींचा चांदोरी येथील ग्रामस्थांना कोणतीही बाधा होत नाही. कारण येथील लोक एकमेकांसोबत एकमेकांच्या धर्माचा आदर करून गुण्यागोविंदाने राहतात.

गावात ग्रामपालिकेच्या नजीक हिंदू धर्मियांचे हनुमान मंदिर, दत्त मंदिर व मुस्लिम बांधवांचे प्रार्थनास्थळ मशिद हे लगतच आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Mandir and Masjid
Ashadhi Ekadashi Bakri Eid : जायखेड्यात कुर्बानी न देण्याचा मुस्लिम बांधवांचा निर्णय

हनुमान जयंती, रमजान ईद व दत्तजयंतीसह इतरही सर्व उत्सव आजही या गावात सर्वधर्मिय भक्तीभावाने साजरे करतात. एका बाजूला भजन तर दुसऱ्या बाजूला अजान असते. मात्र त्यांच्यात कधीच वाद होत नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.

ज्यावेळी हिंदूंचे सण असतात तेव्हा या गावात मुस्लिम बांधव देखील तो सण उत्साहात साजरा करतात. जेव्हा मुस्लिमांचा सण असतो, तेव्हा हिंदू धर्मीय तेवढ्यात भक्तीभावाने त्यांच्या उत्साहात सहभागी होत असतात.

"चांदोरी गावात जुन्या काळापासून हिंदू आणि मुस्लिम समाजाचे लोक एकमेकांशी कौटुंबिक संबंध जपून आहेत. एकमेकांच्या सुखदुःखात ते कायम सहभागी होत असतात."

- संजय गायखे, पंच, मारुती मंदिर.

"चांदोरी गावातील हिंदू मुस्लिम या दोन्ही समुदायांचे एकमेकांशी असलेले कौटुंबिक संबंध हेच आमच्या एकोप्याचे गमक आहे." - मुजमिल इनामदार, ग्रामस्थ, चांदोरी

Mandir and Masjid
Ashadhi: भेटीलागी जिवा लागलीसे आस...! करकमच्या रिंगण सोहळ्यानंतर निवृत्तिनाथांची दिंडी आज चिंचोलीत मुक्कामी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.