Ashadhi Ekadashi Bakri Eid: विंचूर येथे आषाढीला कुर्बानी देणार नाही

Muslim brothers decision not to offer Qurbani on Bakri Eid ashadhi ekadashi
Muslim brothers decision not to offer Qurbani on Bakri Eid ashadhi ekadashi esakal
Updated on

Ashadhi Ekadashi Bakri Eid : आषाढी एकादशी व बकरी ईद (ईदुल अजहा) एकाच दिवशी आल्याने विंचूर शहर मुस्लिम पंच कमिटीतर्फे बकरी ईदला कुर्बानी न देता फक्त सामुहिक नमाज अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गावातील जातीय सलोखा कायम राहावा या उद्देशाने येथील ज्येष्ठ नागरिक भवनात हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकत्रित बैठक झाली. (Ashadhi Ekadashi Bakrid no qurbani at Vinchur nashik)

मुस्लिम बांधवांनी बकरी ईदला कुर्बानी न देता फक्त सामुहिक नमाज अदा करण्याचा व एकादशी निमित्त मुस्लिम बांधवांकडून हिंदू बांधवांना फराळ वाटप करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

मुस्लिम बांधवांच्या या स्तुत्य उपक्रमाचे हिंदू बांधवांच्या वतीने स्वागत करण्यात आले. सरपंच सचिन दरेकर, माज सभापती कैलास सोनवणे, विलास गोरे, विंचूर प्रेस क्लबचे अध्यक्ष डी. बी. काद्री,

इलियास पठाण, किशोर पाटील, अफजल शहा, राजाराम दरेकर, दिलीप चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. बाहेरील घटनांचे पडसाद गावात उमटू न देता गावातील शांतता व जातीय सलोखा कायम राखण्याचे आवाहन केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Muslim brothers decision not to offer Qurbani on Bakri Eid ashadhi ekadashi
Ashadhi Ekadashi Bakri Eid : जायखेड्यात कुर्बानी न देण्याचा मुस्लिम बांधवांचा निर्णय

भैय्यासाहेब देशमुख, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष युसुफखॉं पठाण, नूरमोहम्मद शहा, अमिन मोमीन, धोंडिराम शंखपाळ, इस्माईल मोमीन,फिरोज मोमीन, बाळासाहेब चव्हाण, जयंत साळी, भाऊसाहेब संधान, किशोर जेऊघाले,

मोसिन शेख, रऊफ शेख, इम्रान मोमीन, इलियास पठाण, रफीक शेख, सलीम शेख,अमजद पठाण, साजिद पठाण,सुलतान पठाण, पप्पू शेख, अफजल शहा, रियाज मोमीन, राजू मन्सूरी, हसन मोमीन, मुजम्मील मन्सूरी, अनिल विंचूरकर, अजीम शहा, वसीम अत्तार, रशीद पठाण, तौसिफ बागवान आदींसह हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Muslim brothers decision not to offer Qurbani on Bakri Eid ashadhi ekadashi
Ashadhi Ekadashi Bakri Eid : आषाढी एकादशीमुळे बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी नाही; जपला धार्मिक आदरभाव!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.