Ashadhi Wari 2023: वारकरी भक्तीत न्हाले! हरीनामाच्या जयघोषात निवृत्तीनाथांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

Sant Nivruttinath Maharaj Palakhi
Sant Nivruttinath Maharaj Palakhiesakal
Updated on

Ashadhi Wari : सालाबादप्रमाणे आषाढीवारी साठी निवृत्तीनाथांची पालखी जेष्ठ पौर्णिमे ऐवजी एक दिवस आधीच निघाली तरीही भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. काल पासुनच या वारीसाठी भाविक व काही दिंड्या त्रंबकेश्वर नगरीत येऊन विसाव्या होत्या.

आज सकाळी पासुन भाविक कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी व त्रंबकेश्वर व निवृत्तीनाथांच्या समाधीच्या दर्शनासाठी गर्दी करीत होते. (Ashadhi Wari 2023 Bathed in Departure of sant Nivrittinath palakhi towards Pandharpur nashik news)

esakal

आज सकाळी नेहमी प्रमाणे निवृत्तीनाथांची समाधीचे पुजन झाल्यावर दुपारी दोन वाजता प्रस्तावाचे अभंग व भजन ह. भ. प. जयंत महाराज गोसावी व मानकरी व फडकरी यांनी केल्यावर सजविलेल्या पालखीत नाथांची चांदीची प्रतिमा व पादुका ठेवण्यात आल्या त्या वेळी उपस्थित हजारो भाविकांनी नाथांचा व विठोबा रखुमाई चा जयघोष केला.

पालखी चांदीच्या रथातठेवण्यात आली व सवाद्य मिरवणुकीने कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी आणण्यात आली. त्या समवेत मानाच्या दिंड्या व दिंडी प्रमुख उपस्थित होते. मानाच्या दिंड्या पैकी मोहन महाराज बेलापुरकर, भागवत महाराज लोणारे, बाळकृष्ण महाराज डावरे, एकनाथ महाराज गोळेसर, यांच्यासह निफाड, लासलगाव, सिन्नर, संगमनेर तालुक्यातील दिंड्या व त्यांचे फडकरी यात सहभागी झाले होते.

कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी पालखी आणल्यावर तेथे पालिकेच्या नुतन मुख्याधिकारी डॉ. श्रेया देवचक्के यांच्या हस्ते नाथांच्या प्रतिमेची पुजा व अभिषेक करण्यात आला. या वेळी कुशावर्त भाविकांनी फुलून गेले होते.

कुशावर्त तीर्थावर पालखी सत्यनारायण मंदिरा मागुन त्रंबकेश्वर मंदिराजवळ आल्यावर तेथे उत्तर महाद्वाराच्या समोर त्रंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त भुषण अडसरे व संतोष कदम यांनी नाथांच्या पालखीचे स्वागत करीत पुष्पहार व श्रीफळ समर्पित केले व फडकर्यांचा सत्कार केला.

शहरभर पालखी स्वागतासाठी मोठ्या रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

esakal
Sant Nivruttinath Maharaj Palakhi
Ashadhi Ekadashi Wari : पालखीमार्गात भाविकांना स्वच्छता–सुविधांसाठी २१ कोटी रुपये मंजूर
esakal

पालखीच्या पुढे नृत्य करणारे बारा अश्व सहभागी झाले होते. अनेक भाविक वर्षानुवर्षे या पालखी समवेत पायी पंढरपूरकडे जातात. करोना काळात दोन वर्षे खंडपडल्याने तो भरुन काढण्यासाठी एक प्रकारे ओढ लागल्याने ऐन उन्हात कोणतीही तमा न बाळगता आबालवृद्ध पालखी समवेत निघाले आहेत हे विशेष.

वारकर्यांंसाठी फिनोलेक्स कंपनीद्वारे रेनकोट व पिशव्या पाठविण्यात आल्या असुन त्याचे वाटप केले जाईल असे पालखी सोहळा प्रमुख नारायण मुठाळ यांनी सांगितले.

आजच्या प्रस्थान प्रसंगी मराठवाड्यातील भाविकांची अल्प उपस्थिती होती. परंतु नासिक जिल्ह्यातील व लगतच्या जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने आहेत. एक दिवस आधी प्रस्थान असतांना गर्दी लक्षणीय आहे. निर्मलवारी करण्यासाठी सगळे प्रयत्नशील. ही वारी पायी पंढरपूरकडे दरमजल करीत जाते.

ह्या वाडीतील भाविकांसाठी समवेत प्रसाधनगृह व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, प्रथमोपचार व्यवस्थेसह सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या साठी शासन व अधिकारी व ग्रामस्थांचा सहभाग कौतुकास्पद असल्याचे निवृतीनाथ मंदिराचे अध्यक्ष निलेश गाढवे यांनी सांगितले. त्यांच्या समवेत सचिव सोमनाथ घोटेकर व अन्य विश्वस्त हा सोहळा नेटका व ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासारखा व्हावा यासाठी प्रयत्न शील असल्याचे स्पष्ट केले.

आज नासिकचे खासदार हेमंत अप्पा गोडसे यांच्या हस्ते मंडपबारीच्या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले. या वेळी वारकरी भाविक व दिंडी प्रमुख उपस्थित होते. आजचा मुक्काम त्रंबकेश्वर पेगलवाडी येथील महानिर्वाणी आखाड्यात होणार असुन त्रंबकेश्वर च्या नागरिकांनी त्यांची व्यवस्था केली असल्याचे सांगण्यात आले.

Sant Nivruttinath Maharaj Palakhi
Ashadhi Wari : पालखी प्रस्थानाला मिळणार मर्यादित प्रवेश; प्रत्येक दिंडीत किती वारकऱ्यांना मिळणार संधी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.