त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक) : आषाढी वारी (Ashadhi Wari) साठी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने पंढरीकडे प्रस्थान केले. विठुरायाच्या नामघोषाने अवघी त्रंबकेश्वरनगरी दुमदुमून गेली. आज नाशिकमधील सातपूर मध्ये पालखीचा पहिला मुक्काम होईल. उद्या सकाळी नाशिक पंचायत समितीत स्वागत होईल आणि शहरातून पालखी सोहळा होईल व दुसरा मुक्काम पंचवटीत असेल.
ज्ञानेश्वर महाराज यांचे जेष्ठ बंधु व गुरु निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी पंढरपूरला आज सकाळी अकरा वाजता रवाना झाली. दोन वर्षे वारकरी भाविकांना पंढरपूरला वारी साठी जाता आले नव्हते. खंड पडल्याने नाराज वारकरी आजच्या पायी वारीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व पालखी समवेत निघाले आहेत.
सकाळी नेहमी प्रमाणे समाधीची पुजा संपन्न झाल्यावर ह. भ. प. सुरेश महाराज व जयंत महाराज गोसावी व उपस्थित वारकरी व फडकरी यांनी भजन केले. सजविलेल्या पालखीतून नाथांची चांदीची प्रतिमा व पादुका भाविकांनी केलेल्या जयघोषात चांदीच्या रथात ठेवून सवाद्य रथ कुशावर्तावर अभिषेक पुजेसाठी नेण्यात आला. तेथे पुजक गोसावी व काण्णव यांनी पौरोहित्य केले. तेथुन भजन कीर्तन करीत पालखी मंदिरा समोर आणण्यात आली. तेथे बाहेरुन दर्शन करुन नासिककडे रवाना झाली. पालखीस स्थानिकांनी जव्हार चौफुलीवर निरोप दिला. पालखी समवेत मोठ्या प्रमाणात दिंड्या व पाच नृत्य करणारे अश्व आहेत. दरमजल प्रवास करीत पालखी २६ दिवसांनी पंढरपूरला पोहचेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.