Adoption : आधाराश्रमातील ‘आशी’ला मिळाले अमेरिकन पालक!

ashi adopted by american couple
ashi adopted by american coupleesakal
Updated on

नाशिक : येथील आधाराश्रमातील विशेष काळजीची चिमुकली आशी हिला अमेरिकन दाम्पत्याने दत्तक (Adoption) घेतले. गेल्या आठ महिन्यांपासून दत्तकसंदर्भातील प्रक्रिया सुरू होती. (Ashi special care baby from Aadharashram was adopted by an American couple nashik news)

आजअखेर प्रक्रिया पूर्णत्वास गेल्यानंतर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Gangatharan D.) यांच्या उपस्थितीमध्ये आशी हिला जमशेदी दाम्पत्याच्या स्वाधीन करण्यात आले.

महिला व बालविकास विभागाच्या मान्यताप्राप्त आधाराश्रमात अनाथ व निराधार बालकांच्या संगोपन व पुर्नवसनाचे कार्य करण्यात येते. केंद्रीय दत्तक ग्रहन संसाधन (सी.ए.आर.ए) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रेग्युलेशन 2022 लागू करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात आशी हिला दत्तक बालिकासंदर्भातील कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून डेविन जमशेदी व लायनी जमशेदी यांच्या स्वाधीन करण्यात आले.

श्री व सौ जमशेदी हे कुटुंब अमेरिकेतील रहिवाशी असून या दाम्पत्यांस यापूर्वी एक मुलगा व एक मुलगी अशी जुळी बालके आहेत. आशी हिला जन्मत: एकच किडनी असून तिची जीभ टाळूला चिटकलेली असल्याने त्याची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

ashi adopted by american couple
Nashik News : बिबट्याच्या कातडी विकणारा पोलिसांच्या जाळ्यात; ग्राहक बनून उधळला विक्रीचा डाव

दत्तक नियमावलीनुसार असे बालक विशेष काळजी घोषित केले जात असून ते परदेशी पालकांना दत्तक म्हणून दिले जातात. त्यानुसार जमशेदी दाम्पत्याला जुळी मुले असतांनाही त्यांनी विशेष काळजीचे बालक दत्तक घेण्याची ईच्छा व्यक्त केली होती. मागील 8 महिन्यांपासून ही प्रक्रिया सूरू होती.

आशी हिच्या रूपाने नवीन दत्तक प्रणाली सुरू झाल्यानंतरची ही पहिलीच आंतरदेशीय दत्तक प्रक्रिया नाशिक जिल्ह्यातून पूर्ण झाली आहे. तसेच आजपर्यंत देशांतर्गत या स्वरूपाचे 4 आदेश जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पारित करण्यात आल्याची माहिती आधाराश्रमाचे व्यवस्थापक तथा समन्वयक राहुल जाधव यांनी दिली.

या दत्तक प्रक्रियेवेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महिला व बालविकास अधिकारी अजय फडोळ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भुषण काळे, आधाराश्रमाचे व्यवस्थापक तथा समन्वयक राहूल जाधव यांच्यासह दत्तक पालक डेविन जमशेदी व लायनी जमशेदी उपस्थित होते.

ashi adopted by american couple
नारोशंकराची घंटा : संपत्तीचे राजकीय वारस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.