Animal Vaccination : जनावरांच्या संपूर्ण लसीकरणावर भर द्या; आशिमा मित्तल यांचे निर्देश

Animal
Animal esakal
Updated on

Animal Vaccination : जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांनी २४x७ मुख्यालयी उपस्थित राहून सर्व आजारी जनावरांवर उपचार करावेत.

सध्या जिल्ह्यामध्ये जनावरांचे ७१ टक्के लसीकरण झालेले असून, शनिवारपर्यंत शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व क्षेत्रीय पशुवैद्यकीय अधिकारी यांना दिल्या.

जिल्ह्यात लम्पी प्रादुर्भावासंदर्भात मित्तल यांनी सोमवारी (ता. २१) जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा बैठक घेतली. (ashima mittal instruction to complete full vaccination of animal nashik news)

अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे उपस्थित होते. जिल्ह्यात आठ लाख ९५ हजार ५० गोवंशीय पशुधन असून, लम्पी रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यामध्ये वाढत आहे.

सध्या जिल्ह्यामध्ये ४९ ईपी सेंटरमधून २५७ जनावरे बाधित झाली असून, पशुवैद्यकामार्फत दैनंदिन उपचाराने ४६ पशुधन बरे झाले आहे, तर १३ पशुधनाची मरतूक झाली आहे. सध्या १९८ जनावरांवर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली. आजारी जनावरांची संख्या वाढत असल्याने लसीकरणावर भर देण्यात यावा.

२६ ऑगस्टपर्यंत १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट्ये साध्य करावे, यासाठी तालुका स्तरावर शासकीय अधिकारी, कर्मचारी व खासगी पशुवैद्यकांची मदत घेऊन टिम तयार करून लसीकरण मोहीम स्वरूपात राबविण्याच्या सूचना श्रीमती मित्तल यांनी दिल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Animal
Lumpy Skin Disease : जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा विळखा! पशुसंवर्धन विभाग अलर्ट

गोठे स्वच्छ ठेवण्याच्या सूचना

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना गोठे व गोठ्याचा परिसर स्वच्छ ठेवावा, आवश्यकतेनुसार गोठे फवारणी करण्यात यावी यासाठी ‘माझा गोठा, स्वच्छ गोठा’ ही मोहीम सर्व ग्रामसेवक व पशुसंवर्धन अधिकारी/कर्मचारी यांनी संयुक्त विद्यमाने राबविण्यात यावी, जनावर आजारी होताच तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकाशी संपर्क करावा, आजारी जनावरांना उबदार ठिकाणी, स्वच्छ जागेत बांधावे, सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांना लसीकरण करून सहकार्य करावे, जिल्ह्यामध्ये सदर रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुख्यकार्यकारी अधिकारी मित्तल यांनी पशुपालकांना केले आहे.

Animal
Lumpy Skin Disease : लम्पी स्कीन प्रतिबंधासाठी सर्व पशुधनाचे लसीकरण करा - तुकाराम मुंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.