ZP Super 50 : जिल्हा परिषदेतर्फे यंग टॅलेंट हुडकण्याचे काम : आशिमा मित्तल

Zilla Parishad Chief Executive Officer Ashima Mittal, Aima President Nikhil Panchal, Paula McGlenn, Sunil Khandbahale etc. on the occasion of 'Y20' Manthan Camp.
Zilla Parishad Chief Executive Officer Ashima Mittal, Aima President Nikhil Panchal, Paula McGlenn, Sunil Khandbahale etc. on the occasion of 'Y20' Manthan Camp. esakal
Updated on

ZP Super 50 : ‘सुपर ५०’ कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील शाळांमधील गुणिरत्न (यंग टॅलेंट) हुडकून काढण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे.

या यंग टॅलेंटला आकार देऊन सर्वगुणसंपन्न करण्याचे काम सुरू झाले आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले (Ashima Mittal statement about zp work of finding young talent nashik news)

अंबड इंडस्ट्रीज ॲन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा), यंग इंडियन्स आणि केंद्र सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्यातर्फे नाशिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रांतील युवा उद्योजकांसाठी प्रेरणादायी ‘वाय २०’ मंथन शिबिर ‘आयमा’च्या सभागृहात पार पडले.

या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल बोलत होत्या.प्रमुख मार्गदर्शक म्हणून ‘आयमा’चे अध्यक्ष निखिल पांचाळ, पॉला मॅकग्लेन आणि सुनील खांडबहाले उपस्थित होते. ग्रामीण भागातील यंग टॅलेंटला सर्व क्षेत्रात सक्षम बनवायचे असेल, तर सरकार आणि इंडस्ट्री यांनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. सरकारपुढे अनेक जबाबदाऱ्या आहेत.

त्यामुळे हे कार्य सिद्धीस न्यायचे असेल, तर स्वयंसेवी संस्थांनी त्यासाठी पुढे आले पाहिजे, असेही मित्तल म्हणाल्या. युवकांनी इतरांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे. मात्र अंतिम निर्णय स्वतः घेण्याची तयारी ठेवावी, असा सल्लाही मित्तल यांनी दिला. यशस्वी उद्योजक व्हायचे असेल, तर तरुणांनी नव्या बदलांना सामोरे जाण्याची तसेच नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची तयारी ठेवावी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Zilla Parishad Chief Executive Officer Ashima Mittal, Aima President Nikhil Panchal, Paula McGlenn, Sunil Khandbahale etc. on the occasion of 'Y20' Manthan Camp.
Nashik News: ZP इमारतीत लिकेज जैसे थे! प्राथमिक शिक्षण विभागात मोठया प्रमाणात पाण्याची गळती

सेमी कंडक्टर आणि मेडिकल इंडस्ट्री या क्षेत्रात नवीन पिढीने स्वतःला झोकून दिल्यास भारताचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल राहील, असे ‘आयमा’चे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी सांगितले. रोबोट पद्धतीच्या वापराचे फायदे-तोटेही त्यांनी विशद केले. आपण कुठे असलो तरी आपल्या कामाच्या ठिकाणाचे नियंत्रण करणे आपणास जमले पाहिजे, असेही पांचाळ यांनी पुढे नमूद केले. हा पहिलाच मोठा कार्बन न्यूट्रल उपक्रम आहे.

उद्योग क्षेत्रात नव्या उमेदीने कार्य करण्याची नवी प्रेरणा यामुळे युवकांना मिळेल. तसेच यामुळे उद्योग जगतात नवे कृतिशील पर्व सुरू होईल, असा विश्वासही पांचाळ यांनी व्यक्त केला. दुसऱ्या सत्रात डिजिटायजेशनचे फायदे-तोटे यावर गुलबदन टॉकीज आणि भारतीय डिजिटल पार्टीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पॉला मॅकग्लेन आणि सुनील खांडबहाले यांनी मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक यंग इंडियन्सच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष वेदांत राठी यांनी केले. दिल्लीत याच महिन्यात जी-२० परिषद असून, त्याचा पार्श्वभूमीवर यंग इंडियन्सतर्फे देशभरातील ६३ शहरांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवून तरुणांमध्ये उद्योजकतेबाबत जागृती निर्माण करण्याचे काम केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Zilla Parishad Chief Executive Officer Ashima Mittal, Aima President Nikhil Panchal, Paula McGlenn, Sunil Khandbahale etc. on the occasion of 'Y20' Manthan Camp.
Nashik Political Crisis: सत्ताकारणाच्या राड्यात नाशिकचे प्रश्न प्रलंबित! ना सत्ताधाऱ्यांचे लक्ष, ना विरोधकांचे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.