ZP President Cup Competition: जीवनातील प्रत्येक स्पर्धेत टिकण्यास सक्षम व्हा : आशिमा मित्तल

प्रत्येक क्षेत्रात मिळणाऱ्या संधीचे सोने करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले
Chief Executive Officer Ashima Mittal, Education Officer Nitin Bachhao, Deputy Chief Executive Officer Ravindra Pardeshi etc. while inaugurating the district level art, sports and cultural competition under the Zilla Parishad President's Trophy Competition.
Chief Executive Officer Ashima Mittal, Education Officer Nitin Bachhao, Deputy Chief Executive Officer Ravindra Pardeshi etc. while inaugurating the district level art, sports and cultural competition under the Zilla Parishad President's Trophy Competition. esakal
Updated on

नाशिक : स्पर्धेच्या युगात प्रत्येक क्षेत्रात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच प्रयत्नशील राहिले पाहिजे. आपली कला, संस्कृती व गुणवत्ता सिद्ध करून भविष्यात आपले करिअर घडवावे.

प्रत्येक क्षेत्रात मिळणाऱ्या संधीचे सोने करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. (Ashima Mittal statement at ZP President Cup Competition Able to Survive Every Competition in Life nashik)

येथील स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडासंकुलाच्या मैदानावर जिल्हा परिषद अध्यक्ष करंडक स्पर्धेंतर्गत जिल्हास्तरीय कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे सोमवारी (ता. ५) श्रीमती मित्तल यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले.

त्या वेळी त्या बोलत होत्या. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, अधीक्षक श्रीधर देवरे, धनंजय कोळी, नीलेश पाटोळे, संतोष झोले, प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, अनिल दराडे, सर्व गटशिक्षणाधिकारी व सर्धा प्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांतील सुमारे एक हजार ४०० पेक्षा अधिक खेळाडू व प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक, शिक्षक व पालकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविलेला आहे. स्पर्धकांनी शानदार संचलनाने प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.

जेम्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या बँड पथकांनी तालबद्ध साथ दिली. खेळाडूंच्या सोयीसुविधांची मुख्य कार्यकारी अधिकारींनी प्रत्यक्ष पाहणी करून समाधान व्यक्त केले. प्रत्यक्ष मैदानावर जाऊन खेळाडूंशी संवाद साधला व नाणेफेक करून प्रत्यक्ष स्पर्धांना प्रारंभ केला.

Chief Executive Officer Ashima Mittal, Education Officer Nitin Bachhao, Deputy Chief Executive Officer Ravindra Pardeshi etc. while inaugurating the district level art, sports and cultural competition under the Zilla Parishad President's Trophy Competition.
Police Sports Competitions: पुणे-चिंचवड, अमरावती, नागपूरची विजय सलामी! 34 व्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांना थाटात प्रारंभ

अध्यक्ष करंडक स्पर्धा दोन गटांमध्ये (लहान गट- पहिली ते पाचवी व मोठा गट सहावी ते आठवी) व १४ प्रकारांत घेण्यात येत आहेत. प्रत्येक स्पर्धा प्रकारात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेले स्पर्धक व संघ सहभागी झाले आहेत.

सोमवारी दिवसभरात कबड्डी मुले-मुली, खो-खो मुले- मुली, वक्तृत्व लहान व मोठा गट, वैयक्तिक गीतगायन लहान व मोठा गट, वैयक्तिक नृत्य लहान व मोठा गट, समूहगान लहान व मोठा गट, समूहनृत्य लहान गट, चित्रकला लहान व मोठा गट, बुद्धिबळ लहान व मोठा गट या स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

पारितोषिक वितरण आज

मंगळवारी (ता. ६) धावणे, समूहगीत गायन व समूहनृत्य मोठा गट, स्पेलिंग बी व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी चारला पारितोषिक वितरण होणार आहे.

Chief Executive Officer Ashima Mittal, Education Officer Nitin Bachhao, Deputy Chief Executive Officer Ravindra Pardeshi etc. while inaugurating the district level art, sports and cultural competition under the Zilla Parishad President's Trophy Competition.
NMC News : अपघातप्रवण क्षेत्रातील अतिक्रमणांवर हातोडा; पंचवटी विभागातून होणार कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.