Nashik Municipal Commissioner : पालकमंत्र्यांच्या स्पर्धेत भुसेंची बाजी; महापालिका आयुक्तपदी 'यांची' नियुक्ती

Ashok Karanjkar appointed as Nashik Municipal Commissioner nashik news
Ashok Karanjkar appointed as Nashik Municipal Commissioner nashik newsesakal
Updated on

Nashik Municipal Commissioner : गेल्या दीड महिन्यापासून रिक्त महापालिकेच्या आयुक्तपदी राज्य कामगार विमा आयुक्त अशोक करंजकर यांची नियुक्ती शुक्रवारी (ता. २१) राज्य शासनाने रात्री उशिरा जाहीर केली.

करंजकर हे येत्या सोमवारी (ता. २४) पदाचा कार्यभार स्वीकारतील. पालकमंत्री दादा भुसे यांची अंतिम शिफारस झाल्यानंतर करंजकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.

माजी पालकमंत्री गिरीश महाजन व छगन भुजबळ यांच्याकडून आयुक्त पदाचे नावे सुचविले जात होते. आजी- माजी पालकमंत्र्यांच्या स्पर्धेत भुसे यांनी बाजी मारल्याचे बोलले जात आहे. (Ashok Karanjkar appointed as Nashik Municipal Commissioner nashik news)

राज्य शासनाने नवीन आयुक्त नियुक्त केले जात नाही, तोपर्यंत अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बाणायत यांच्याकडे आयुक्त पदाचा कार्यभार सोपविला. मागील दीड महिन्यापासून महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त नसल्याने महापालिकेचे कामकाज रामभरोसे चालले होते.

महापालिका मुख्यालयातील अधिकाऱ्यांकडूनदेखील पूर्णवेळ आयुक्त कधी नियुक्ती होईल, याबाबत वारंवार विचारणा केली जात होती. प्रभारी आयुक्तांकडेच पुढील चार ते पाच महिने कार्यभार राहील, अशी टूमदेखील मध्यंतरीच्या काळात निघाली. अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी राज्य कामगार विमा आयुक्त अशोक करंजकर यांची नियुक्तीची घोषणा केली.

नवीन आयुक्त कार्यकाळ पूर्ण करतील का?

२०१६ मध्ये डॉ. प्रवीण गेडाम नाशिक महापालिकेचे आयुक्त होते. दीड वर्ष त्यांना या पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर २०१७ मध्ये, अभिषेक कृष्णा १७ महिने आयुक्त राहिले. २०१८ मध्ये तुकाराम मुंढे रुजू झाले. त्यांची नऊ महिन्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली. त्यानंतर राधाकृष्ण गमे वीस महिने आयुक्त राहिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ashok Karanjkar appointed as Nashik Municipal Commissioner nashik news
Nashik Rain Alert : जिल्ह्याच्या घाटमाथा भागात आज जोरदार पावसाचा अंदाज

कैलास जाधव १६ महिने, तर रमेश पवार चार महिने आयुक्तपदावर राहिले. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार दहा महिने आयुक्त राहिले. त्यामुळे आता नवीन आलेले आयुक्त हे तरी कार्यकाळ पूर्ण करतील का, असा सवाल नाशिककरांमधून उपस्थित केला जात आहे.

रणजित कुमार चार दिवसांचे आयुक्त

१ ते ५ जून २०१२ या कालावधीत जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित कुमार यांच्याकडे आयुक्त पदाचा कार्यभार होता. कागदोपत्री सर्वात कमी म्हणजे पाच दिवसांच्या कालावधीची नोंद असली तरी त्यांच्याकडे प्रभारी आयुक्त पद होते. नियमित पदभार असलेल्या राजीव अग्रवाल हेच कमी कालावधीचे आयुक्त ठरले.

त्या खालोखाल रमेश पवार औटघटकेचे आयुक्त ठरले. तत्कालीन जिल्हाधिकारी पी. वेलरासु, डॉ. संजीव कुमार यांच्याकडे चार महिन्याचा प्रभारी कार्यभार होता. सोनाली पोंक्षे- वायनगंकर यांच्याकडे तीन महिने प्रभारी कार्यभार राहिला.

Ashok Karanjkar appointed as Nashik Municipal Commissioner nashik news
Nashik District Collector : जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांची बदली; 'हे' आहेत नाशिकचे नवे जिल्हाधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.