मेशी (जि. नाशिक) : वीस वर्षांपासून आश्रमशाळेच्या इमारतीला ग्रामपंचायतीने जागा देऊनही केवळ निधीअभावी देवपूरपाडे (ता.देवळा) येथील शासकीय आश्रमशाळेच्या इमारतीच्या बांधकामाला मुहूर्त लागत नाही.
यातच शाळेला इमारत नसल्याने येथील विद्यार्थ्यांचे पांढरुन (ता. मालेगाव) येथील शाळेत स्थलांतर केल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. (Ashram school being attended openly for 20 years due to lack of buildings Disadvantage of students due to relocation of schools nashik news)
देवपूरपाडे (ता. देवळा) येथे शासकीय आश्रमशाळा असून याठिकाणी २२९ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. मात्र या शाळेला हक्काची इमारत नसल्याने शाळा ही भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या इमारतीमध्ये भरविली जात आहे.
शाळेला हक्काची इमारत असावी म्हणून येथील ग्रामपंचायतीने पाच एकर जागा विभागाला दिली. २०१३ साली शाळेच्या इमारत बांधकामासाठी बांधकाम विभागाकडून १० कोटी ३४ लाख रुपयांचे प्राथमिक अंदाजपत्रक देखील करण्यात आले.
परंतु निधीच्या पूर्ततेअभावी बांधकामाची प्रशासकीय मंजुरी रखडली आहे. यातच इमारत चांगली नसल्याने पाच वर्षापूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे पांढरुन (ता. मालेगाव) येथे समायोजन करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची तसेच पालकांची मोठी गैरसोय होत आहे.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
देवपूरपाडे येथील आश्रमशाळा मंजुरी पासून भाड्याच्या रहिवासी घरांमध्ये भरविली जात होती. या कालावधीत २०१२ साली पडक्या घराचे छत कोसळून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी स्थानिक पदाधिकारी यांनी सातत्याने पाठपुरावा करूनही अद्यापही शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.
"गावातील व परिसरातील आदिवासी मुलांची शिक्षणाची सोय व्हावी यासाठी गावाने २०१२ साली ५ एकर जागा देऊन संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही इमारत झालेली नाही"
- शिवाजी अहिरे, उपसरपंच देवपूरपाडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.