Ashram School Teacher Exam : आदिवासी विकास विभागाने १७ सप्टेंबरला प्रस्तावित केलेल्या शिक्षक क्षमता चाचणी परीक्षेवर सीटू प्रणित आदिवासी आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेने घातलेला राज्यव्यापी बहिष्कार कायम आहे.
आदिवासी आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीत संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर कोणताही तोडगा न निघाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड व राज्य सरचिटणीस प्रा. बी. टी. भामरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. (Ashram School Teacher Exam boycott of CITU organization on Teacher Aptitude Test continues nashik news )
आदिवासी विभागाने कोणतेही पूर्वनियोजन न करता, शिक्षक संघटनांना विश्वासात न घेता, परीक्षेचे नेमके स्वरूप आणि उद्देशांची स्पष्टता न देता एका विषयाच्या शिक्षकाला उर्वरित सर्वच विषयांच्या परीक्षेला सामोरे जाण्याची अनाठायी अट टाकून, अभ्यासक्रमाचे निश्चित स्वरूप व परीक्षा दर्जाची निश्चिती न करता प्रस्तावित केलेली शिक्षक क्षमता चाचणी ही केवळ शिक्षकांचा आतापर्यंत दिलेल्या योगदानाकडे दुर्लक्ष केल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
आश्रमशाळांची वेळ बदलण्यात यावी, यासह प्रलंबित मागण्यांबाबत आदिवासी विकास विभागाने कोणतीही केलेली नाही. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विभागाच्या नावलौकिकासाठी आश्रमशाळा शिक्षक सदैव कटिबद्ध आहेत, मात्र त्या सर्वांना विश्वास घेऊन व प्रलंबित समस्या सोडविण्याच्या अधीन राहून याबाबत तोडगा काढावा, अशी अपेक्षा संघटनेने बैठकीत व्यक्त केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शिक्षक क्षमता चाचणी परीक्षेवरील बहिष्कार १०० टक्के कायम राहील, असे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी सांगितले. राज्यभरातील शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेतील ८५० शाळांतील शिक्षकांनी लेखी पत्रावर स्वाक्षऱ्या करून परीक्षेवर बहिष्कार टाकणार असल्याबाबतचे प्रशासनास व संघटनेस लेखी कळविलेले असल्याचे सरचिटणीस भामरे यांनी म्हटले आहे.
शिष्टमंडळात नाशिक विभागीय अध्यक्ष अमोल वाबळे, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष भरत पटेल, शीतल खंडे, सुदाम धात्रक, गोपाळ वंजारे, जव्हार प्रकल्प अध्यक्ष योगेश जगताप, संपर्कप्रमुख दिगंबर वळपतके, कार्याध्यक्ष सोमनाथ शेवाळे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.