Nashik News: भुयारी गटार योजना निविदेत फेरफार : आसिफ शेख

Malegaon Municipal Corporation latest marathi news
Malegaon Municipal Corporation latest marathi newsesakal
Updated on

Nashik News : शहरासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शहर मलनिस्सारण टप्पा-२ भुयारी गटार योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या संस्थेने निविदा दाखल करण्यासाठी तयार केलेल्या अटी, शर्ती आक्षेपार्ह आहेत.

ही बाब लक्षात घेता आयुक्त, जीवन प्राधीकरण व मनपा अभियंते यांनी संगनमताने या योजनेचा ठेका हित संबंधातील व्यक्तीस मिळावा यासाठी निकृष्ट दर्जाच्या अटी शर्ती घातल्या.

त्यावरुन या योजनेचा निविदा मंजुरीत ‘पन्नास खोके सब कुछ ओके’ करण्याचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आसिफ शेख यांनी गुरुवारी (ता.१) येथे पत्रकार परिषदेत केला. (Asif Shaikh statement Underground Sewerage Scheme tender changes Nashik News)

श्री. शेख म्हणाले, की क्षुल्लक व फुटकळ अटी शर्ती असलेली ही निविदा कमकुवत ठेकेदाराला मिळावी. दर्जेदार संस्था, कंपन्या व ठेकेदारांनी यात सहभागी होऊ नये या हेतूने तयार करण्यात आली आहे. ही निविदा रद्द न झाल्यास पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

वेळप्रसंगी न्यायालयात जनहित याचिका दाखल करु असा इशारा श्री. शेख यांनी दिला आहे.

मनपा पाणीपुरवठा विभागाने अमृत-२ अंतर्गत भुयारी गटार योजनेची ४१९ कोटीची ई-निविदा मागवली आहे. शहरात या योजनेचे पहिल्या टप्प्यातील ९८ कोटी ४२ लाख रुपये खर्चाचे काम सुरु आहे. यातही जीवन प्राधिकरण प्रकल्प सल्लागार आहेत.

या कामाचे कार्यारंभ आदेश फेब्रुवारी २०१९ ला आनंद कन्ट्रस्ट्रक्शन प्रा. लि. नाशिक या मक्तेदारास देण्यात आले. कामाची मुदत २४ महिन्यांची असताना चार वर्षात ७० टक्के काम पूर्ण झाले. संथ गतीने काम सुरु आहे.

विशेष म्हणजे हे काम शहराबाहेर व विना अडथळा असताना एवढा विलंब होतो आहे. किरकोळ मक्तेदार असल्यास दुसऱ्या टप्प्यातील योजनेच्या कामाची वाट लागून महत्वकांक्षी प्रकल्पाचा बट्ट्याबोळ होईल असेही श्री. शेख म्हणाले. यावेळी माजी सभागृह नेते अस्लम अन्सारी, माजी नगरसेवक शकील बेग आदी उपस्थित होते.

श्री. शेख यांनी ही निविदा रद्द करावी या प्रकरणी चौकशी व्हावी या मागणीचे निवेदन नगरविकास विभाग, जीवन प्राधिकरणचे सचिव अभिषेक कृष्णा, जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता सुभाष भुजबळ, अपर पोलिस अधिक्षक व संबंधितांना पाठविले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Malegaon Municipal Corporation latest marathi news
NMC Commissioner Transfer : नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली

भुयारी गटार योजना संदर्भात घेतलेले आक्षेप

- शहराच्या भौगोलिक परिस्थितीनुसार सर्वेक्षण नाही

- प्रकल्पाचे रेखाचित्र नाही

- ५०० कोटींच्या या प्रकल्पासाठी किमान ५०० ते १००० कोटीची उलाढाल असलेली कंपनी हवी.

- जीवन प्राधिकरणाकडून पाच वर्षात दीडशे कोटींची उलाढाल नमूद

- कमकुवत मक्तेदारास निविदा मिळावी यासाठी निविदेत कमकुवत अटी

- २४ महिन्यात काम पूर्ण करण्याची मुदत आहे.

- निविदेत २१.५ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प

- मुख्य पंपिंग स्टेशनचा तांत्रिक अनुभव विचारात घेण्यात आला नाही.

- ५६ किलोमीटर पाइपलाइन होणार असताना रस्ते खर्चासाठी तरतूद नाही

- यंत्रसामग्री आवश्‍यकता दर्शविलेली नाही.

- प्रकल्प पाहता ट्रेंचलेस / एसडीडी यंत्राची आवश्‍यकता

- मॅनहोलची तरतूद नाही.

- मक्तेदाराचे भाग भांडवल अवघे २५ कोटीचे आहे.

Malegaon Municipal Corporation latest marathi news
Nashik News: घरकुल मंजूर होऊनही प्रतिक्षाच; आजी, माजी सैनिकांसह पोलिसांची बोरसे कुटुंबीयांस मदतीचा हात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.