Nashik Accident : शेतकऱ्याचा मुलगा ते पोलीस अधिकारी! ही ओळख असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा मृत्यू

Assistant Police Inspector dies in an accident nashik accident news
Assistant Police Inspector dies in an accident nashik accident newsesakal
Updated on

Nashik Accident News : २९ जून गुरुवार रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल-कासोदाकडे जात असताना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या गाडीवर झाड कोसळल्याची घटना घडली. त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह चालकांचा देखिल मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. (Assistant Police Inspector dies in an accident nashik accident news)

या अपघातात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन दातीर (रा.अंबड गाव, नाशिक) व चालक अजय चौधरी हे दोन्ही जागेवरच ठार झाले. तर चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना बाहेर काढण्यात आले. अंजनी धरणालगत ही दुर्घटना घडली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Assistant Police Inspector dies in an accident nashik accident news
Nashik Accident News: शिरवाडे वणीला बसच्या धडकेत 3 ठार; ग्रामस्थांनी रोखला मुंबई-आग्रा महामार्ग

आर्थिक गुन्हे शाखेचे हे पथक पिलखोड येथील एका प्रकरणी तपासासाठी जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मयत एपीआय सुदर्शन दातीर हे अंबड येथील रहिवासी असून त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली. रात्री अनेक गांवकरी वाहनाने जळगावकडे रवाना झाले. दातीर यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व एक लहान मुलगा असा परिवार आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा ते पोलीस अधिकारी अशी ओळख तयार केलेल्या दातीर यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

Assistant Police Inspector dies in an accident nashik accident news
Pune accident news : पुण्यात मिनी बसचा स्टेअरिंग रोड तुटल्याने अपघात सुदैवाने नऊ जण बचावले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.