Nashik : सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पोलिस नाईकाला लाच घेताना अटक

Arrested inspector
Arrested inspectoresakal
Updated on

जुने नाशिक : भद्रकाली पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रणिता पवार आणि पोलिस नाईक तुषार बैरागी यांना बुधवारी (ता. १८) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० हजारांची लाच (Bribe) घेताना मुद्देमालासह अटक केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (Assistant Police Inspector Naik arrested for taking bribe Nashik Crime News)

दोन ते तीन महिन्यांपूर्वी तक्रारदाराविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होता. त्याचा तपास प्रणिता पवार करीत होत्या. गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासह न्यायालयात लवकरात लवकर दोषापत्र दाखल करण्यासंदर्भात प्रणिता पवार यांनी तक्रारदाराकडे शुक्रवारी (ता. १३) २० हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी केली. त्यावरून बुधवारी तिवंदा पोलिस चौकीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक वैशाली पाटील, राजेंद्र गिते, शरद हेंबाडे, अजय गरुड, प्रकाश महाजन, परशुराम जाधव यांनी सापळा रचून प्रणिता पवार आणि पोलिस नाईक तुषार बैरागी यांना २० हजारांची लाच घेताना अटक केली.

Arrested inspector
लाच मागणाऱ्या हवालदाराला अटक; 23 दिवसांनंतर गुन्हा दाखल

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक नारायण न्याहळदे, उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, मंगळवारी (ता. १७) आडगाव पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना पोलिस कर्मचाऱ्याला अटक केली होती. या घटनेस २४ तास उलटत नाही तोच भद्रकाली पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले.

Arrested inspector
Crime : पत्नीच्या डोक्यात फावड्याने वार करून खून करणारा जेरबंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.