Atirudra Mahayadnya : समृद्धीसाठी अतिरुद्र स्वाहाकार महायज्ञ; हजारो भाविकांच्या उपस्थितीत समारोप

At the conclusion of the Atirudra Swahakar Mahayagya, Mahamandaleshwar Shivananda Maharaj Avadhoot, Yogi Tantra Samrat Sri Sri Vilas Nath, Hanumantrao Gaikwad, R. V. S Money, Pandit Murali Sundaresh and Bhavik
At the conclusion of the Atirudra Swahakar Mahayagya, Mahamandaleshwar Shivananda Maharaj Avadhoot, Yogi Tantra Samrat Sri Sri Vilas Nath, Hanumantrao Gaikwad, R. V. S Money, Pandit Murali Sundaresh and Bhavikesakal
Updated on

Atirudra Mahayadnya : शिवगोरक्ष योगपीठ, अमृतधाम यांच्यातर्फे शिवगोरक्ष अतिरुद्र महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी (ता. ५) त्याचा समारोप करण्यात आला. यात प्रामुख्याने महागणपती यज्ञ, सहस्त्रचंडी पाठ, प्रत्येक वेद पंडितांचे दोन एकादश रुद्र यज्ञ संपन्न झाला.

या वेळी १५० ब्राह्मणांकडून पौरोहित्य केले. तर, यज्ञासाठी १ हजार किलो तुपाची आहुती देण्यात आली. या वेळी साधू, महंत, तसेच बीव्हीजी ग्रुपचे चेअरमन हनुमंतराव गायकवाड व विविध मान्यवर, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Atirudra Swahakara Mahayagna for Prosperity Concluded in presence of thousands of devotees nashik news)

नकारात्मक गोष्टी दूर करण्यासाठी आणि सर्व प्रकारची संपत्ती, शांती आणि आनंद प्रदान करण्यासाठी भगवान शिवाची पूजा करण्याचा हा एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे. श्री रुद्र मंत्र हा भगवान शिवाला आवाहन आहे, रू म्हणजे दुःख आणि द्र म्हणजे विनाशक म्हणून रुद्रम दुःखाचा नाश करतो.

श्री रुद्रम हे एक शक्तिशाली आणि महत्त्वपूर्ण वैदिक स्त्रोत्र आहे. जे सर्व अडचणी व नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि भरपूर संपत्ती, आनंद आणि शांती प्रदान करते. देह, मन आणि पर्यावरण यांच्या शुद्धीसाठी यज्ञ केला जातो.

भारताचे आर्थिक कल्याण आणि विकास, तसेच कोरोना आणि इतर विषाणूजन्य आजाराचे निर्मूलन यासाठी हा महायज्ञ आयोजित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे सर्व जनता, शासन यांच्या कल्याणसह आपल्या राष्ट्रातील जिवंत प्राणी,

शेतीमध्ये चांगले उत्पन्न, औद्योगिक उत्पादनांमध्ये सुधारणा व्यापार व वाणिज्यमध्ये समृद्धी यासाठी या यज्ञाचे आयोजन करण्यात आल्याचे शिवगोरक्ष योगपीठातर्फे सांगण्यात आले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

At the conclusion of the Atirudra Swahakar Mahayagya, Mahamandaleshwar Shivananda Maharaj Avadhoot, Yogi Tantra Samrat Sri Sri Vilas Nath, Hanumantrao Gaikwad, R. V. S Money, Pandit Murali Sundaresh and Bhavik
Nashik News : माजी विद्यार्थ्यांनी गुरुजनांच्या पादयपूजनातून जपले ऋणानुबंध

या वेळी संत श्री भगवान महाराज माऊली, आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष श्री १००८ महामंडलेश्वर शिवानंद महाराज अवधूत, योगी तंत्रसम्राट श्री श्री विलास नाथ, सनदी अधिकारी आर. व्ही. एस मनी, पंडित मुरली सुंदरेश, प्रा. डॉ. ए. पी. विजयांबिका,

प्रा. नीला राजू, ताराचंद गुप्ता, जितेंद्र पाटोळे , शांताराम हांबरे, पोपट पगार, राजेंद्र पवार, राजेंद्र मोगल, मच्छिंद्र साठे, प्रदीप तायडे, श्रीकांत जोशी, विकास निचित यांसह भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

At the conclusion of the Atirudra Swahakar Mahayagya, Mahamandaleshwar Shivananda Maharaj Avadhoot, Yogi Tantra Samrat Sri Sri Vilas Nath, Hanumantrao Gaikwad, R. V. S Money, Pandit Murali Sundaresh and Bhavik
Nashik News: दिंडोरी रोडवर पुन्हा 29 उंट ताब्यात; पांजरपोळ येथे 111 उंटांची वैद्यकीय पथकाकडून तपासणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()