Market Committee Election : पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत निफाड तालुक्यातील ६९ गावांचा समावेश येतो. दोन हजार ६६७ मतदारसंख्या असलेल्या पिंपळगाव बाजार समितीच्या रणसंग्रामात आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये जोरदार धुमशान रंगणार आहे.
याचे संकेत सहा सोसायट्यांच्या न्यायालयीन लढाईत आले होते. अर्ज छाननी होताच बनकर-कदम यांनी माघारी व पॅनलच्या घोषणेपूर्वीच प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. (atmosphere heated due to campaign meetings of dilip Bankar anil Kadam Market Committee Election nashik news)
बाजार समितीच्या माघारीनंतर अवघे सहा दिवस प्रचारासाठी हाती शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे दोन्ही मुत्सद्दी नेत्यांनी माघारीपूर्वीच पंधरा दिवस प्रचारात आघाडी घेत मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. निफाड तालुक्याचे वातावरण उन्हाने तापत असताना दुसरीकडे बाजार समितीच्या सभांनीही वातावरण तापायला सुरवात झाली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होत नसल्याने राजकीय पद व प्रतिष्ठेसाठी आसुसलेल्या इच्छुकांनी पिंपळगाव बसवंत बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्या आणि एकच भाऊगर्दी केली. ते दाखल झालेल्या ३०९ उमेदवारी अर्जावरून स्पष्ट होते.
इच्छुकांची जत्रा पाहून आमदार बनकर व कदम यांना निवडणुकीपूर्वीच चांगलाच घाम फुटला आहे. माघारीसाठी आपापल्या समर्थकांसाठी प्रचाराद्वारे घाम गाळावा लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. परस्परांवर राजकीय डावपेच खेळण्यास सुरवात झाली आहे.
माघारीपूर्वीच प्रचाराचा धुरळा
उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेल्यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरताच आमदार बनकर व कदम गटाने माघारीपूर्वीच प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. गावागावात जाऊन सोसायटीचे संचालक व ग्रामपंचायत सदस्यांची चौकसभा घेऊन भूमिका पटवून दिली जात आहे.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
आमदार बनकर हे पिंपळगाव बाजार समितीचा गेली वीस वर्षात केलेला कायापालट, विकासकामे मांडत आहे. तर माजी आमदार कदम यांच्याकडून बनकर यांच्या कार्यकाळातील निष्क्रियता मतदारांपुढे ठेवली जात आहे.
प्रत्येक मतदारांना आपल्याकडे ओढण्याचे काम आतापासूनच केले जात असल्याचे चित्र आहे. बनकर-कदम यांची प्रतिष्ठा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पिंपळगावकरांचा कौल काय असणार आहे. बनकर व कदम यांच्याकडून विधानसभेचा तिर मारला जाणार आहे. पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्त हायव्होल्टेज राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले आहे.
आचारसंहितेत अडकली ग्रामपंचायतीची विकासकामे
कोणत्याही राजकीय पक्ष किंवा चिन्हावर बाजार समितीची निवडणूक नसताना प्रशासनाकडून मात्र ग्रामपंचायतीवर आचारसंहिता लादली गेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या विकासकामांच्या प्रक्रियेला बाधा येणार आहे. निविदासह विकासकामे रखडली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.