नाशिक : उद्योजकावरील हल्ला दुर्दैवी

late nandkumar aher
late nandkumar aheresakal
Updated on

सातपूर (जि. नाशिक) : कायदा व सुव्यवस्था सांभाळणे प्रशासनाचे काम आहे. परंतु, गेल्या काही दिवसात नाशिक शहरात गुन्ह्यांचे (Crime) प्रमाण वाढले असल्याने सर्वसामान्य नागरिक धास्तावले आहेत. अशातच चक्क उद्योजकाचा खून (Murder) दुर्दैवीच म्हणाले लागेल, असे मत उद्योजक नेते तथा निमा, आयमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांनी व्यक्त केले. (Attack on Entrepreneur is unfortunate series of murders in city Nashik Crime News)

शहरात वेगाने पोलिस पेट्रोलिंग व्हावी या हेतूने शहरातील वेगवेगळ्या भागात पोलिस चौक्या लोकसहभागातून सुरू करण्यात आल्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्या काही कारणास्तव बंद आहेत. त्या तातडीने चालू करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे पोलिसांचा धाक गुन्हेगारांवर राहण्यास व वेळप्रसंगी तातडीची मदत मिळण्यासाठी सोयीचे होते. स्मार्ट सिटी अंतर्गत सीसीटीव्ही बसविण्यात येणार, अशी घोषणा करण्यात आली. त्यावरही प्रशासनाने तातडीने लक्ष घालते पाहिजे. त्यामुळे धाक राहून गुन्हे करणाऱ्यांना सुद्धा चाप बसतो, असेही बेळे म्हणाले.

गेले काही वर्ष वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटकेत असलेले व आता त्यांची शिक्षा संपल्यानंतर हे गुन्ह्यात अडकलेले काही अट्टल गुन्हेगार बाहेर आले आहेत. त्यांच्याकडूनही या चुकीच्या गोष्टी होत असल्याचे समजते. पोलिस प्रशासनाने याबाबत गंभीरतेने विचार करून योग्य ते कार्यवाही केली पाहिजे. उद्योजकाच्या कंपनी बाहेर सकाळी खून होणे अंत्यत दुर्दैवी घटना आहे. याबाबत प्रशासनाने संबधितांवर अत्यंत कठोर कारवाई केली पाहिजे. उद्योजकांनी सुद्धा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही लावून व आपले वैयक्तिक सिक्युरिटी वाढवून सतर्कता बाळगली पाहिजे, असेही आवाहन या वेळी बेळे यांनी उद्योजकांना केले.

उद्योजक, व्यापाऱ्यांची आज तातडीची बैठक

खुनाच्या घटनेनंतर शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर तसेच उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत विचारविनिमय करण्यासाठी सर्व व्यापारी तसेच उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बुधवारी (ता. ८) सकाळी १०. ३० वाजता अंबड येथील अंबड इंडस्ट्रीज ॲन्ड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (आयमा) सभागृहात होणार आहे. असून त्यास सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ आणि बीओटी चेअरमन धनंजय बेळे यांनी केले. घटनेमुळे उद्योजकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. दोन जूनपासून पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन आणि पेट्रोलिंग सुरू केले असतानाही खूनसत्र थांबत नाही, हे अतिशय गंभीर आहे. व्यापारी आणि उद्योजकांना अधिकाधिक सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर बैठकीला विशेष महत्त्व असल्याचेही निखिल पांचाळ, धनंजय बेळे, सुधाकर देशमुख, प्रदीप पेशकार, विक्रम सारडा, विवेक कुलकर्णी, संदीप गोयल यांनी सांगितले.

late nandkumar aher
सैराट स्टाईल मारहाण प्रकरणी तब्बल 20 ते 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

"कामावरून कमी केल्याचा राग येऊन उद्योजकांचे खून पाडण्याची मानसिकता होत असेल तर सर्व उद्योजकांनी शस्त्र परवाने घ्यायचे की काय, याचे उत्तर पालकमंत्र्यांनी देण्याची गरज आहे. फक्त आरोपी पकडले म्हणजे पोलिसांचे काम झाले असे समजून चालणार नाही, तर हे करण्याची हिंमत होता कामा नये, हे खरे पोलिसिंग होय."

- प्रदीप पेशकार, प्रदेशाध्यक्ष, भाजप उद्योग आघाडी

"तलवारीने मुडदे पाडत असतील तर समाजात उद्योजक निर्माण होतील कसे."

- निखिल पांचाळ, अध्यक्ष, आयमा

"कोरोनानंतर बहुतेक कंपन्यांमध्ये आर्थिक परिस्थिती बिकट असताना केवळ आहे ते कामगारांचा प्रपंच सुरू राहावा यासाठी आटापिटा करताना उद्योजक असताना दिवसाढवळ्या हल्ला होत असेल तर कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे लक्षण आहे."

- राजेंद्र पानसरे, उपाध्यक्ष, आयमा

late nandkumar aher
ऑनलाईन फसवणूकीतील रक्कम पुन्हा तक्रारदाराच्या खात्यात सुपूर्द

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()