मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील फिरदौसगंज भागात पोलिस ठाण्यात तक्रार केल्याच्या वादातून कुरापत काढून सात ते आठ जणांनी तरुणावर तलवार, कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रकार घडला. सोमवारी (ता.१२) मध्यरात्री दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. (Attack on young man with sword axe in Firdausganj area Nashik Crime News)
हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....
आकीब अहमद शकील अहमद (रा. फिरदौसगंज) याच्या घरावर संशयितांनी हल्ला करत त्यास मारहाण केली. मारहाणीत तलवार, कोयत्याचे वार झाल्याने आकीब जखमी झाला. संशयितांनी शॉकअपनेही मारहाण केली. या प्रकरणी संशयितांविरुद्ध पवारवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दंगल व शस्त्रास्त्र कायद्यान्वये तसेच, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस फरार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
आकीब अहमद याचा मित्र राशिद मोहम्मद याला जुलै २०२२ मध्ये रब्बानी व इतरांनी मारहाण केली होती. या प्रकरणी आकीब अहमदने संशयितांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याचा राग मनात धरुन सात ते आठ जणांनी आकीबच्या घरावर हल्ला चढविला. दरवाजाला लाथा मारत दरवाजा तोडून घरात घुसून धमकी देत तलवारीने वार केला. अब्दुल रहेमान, नकसब काल्या, मोहसीन आदींसह अन्य अनोळखी तीन ते चार जणांनी शॉकअपने डोक्यावर, हातावर, पायावर मारहाण केली.
हल्ल्यात आकीब अहमद जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आकीबच्या तक्रारीवरून आठ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्याचा प्रकार समजल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, पोलिस निरीक्षक एस. बी. पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक बडगुजर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी संशयितांचा शोध सुरु केला आहे. उपनिरीक्षक व्ही. ए. परदेशी तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.