नाशिक : घरात पेट्रोल टाकून कुटुंबाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न

Burnt House
Burnt HouseSakal
Updated on

म्हसरूळ (नाशिक) : पंचवटीतील शिंदे नगर येथील भाविक बिलाजियो सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाच्या घरात घुसून एका रिक्षाचालकाने थेट पेट्रोल ओतून आग लावून दिल्याची घटना घडली आहे. यात दोन महिला गंभीर भाजल्या असून सुदैवाने एक वयोवृद्ध आणि दोन लहान मुले बचावली आहेत. याबाबत पंचवटी पोलीस अधिक तपास करीत आहे.

याबाबत पोलिसांनी व पीडित कुटुंबियांच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, शिंदे नगर येथील भाविक बिलाजियो सोसायटीच्या फ्लॅटमध्ये प्रदीप ओमप्रकाश गौड आपल्या कुटुंबा समवेत राहतात. आई, वडील, पत्नी भाऊ, भावजयी, मुले आणि पुतण्या असे एकूण दहा लोक राहतात. मंगळवार (ता. १०) रोजी सकाळी प्रदीप यांची मावशी भारती गौड या आल्या होत्या. साधारणतः बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या परिचयातील रिक्षाचालक कुमावत (पूर्ण नाव माहित नाही) हा आपल्या हातात दोन पेट्रोलच्या बाटल्या घेऊन प्रदीप यांच्या घरी आला . सुरुवातीस घरात असलेल्या भारती गौड यांना जबर मारहाण केली आणि बाटल्यांमधील पेट्रोल घरात फेकत आग लावून देत फरार झाला .

Burnt House
नाशिक शहर बससेवेची यशस्वी वाटचाल; महिनाभरातच ६५ लाखांचा महसूल

घरात प्रदीप यांची आई सुशीला गौड (६५), आजोबा जानकीदास गौड(८५), पार्थ गौड (१५), चिराग गौड (३), मावशी भारती गौड (५५) हे होते . घरात झालेल्या भांडणाचा आवाज आणि घराला लागलेली आग पाहून पार्थ याने बेडरूमचा दरवाजा लावून घेत आपल्या वडिलांना आणि आईला फोन लावून घटनेची माहिती दिली . या आगीच्या घटनेमध्ये सुशीला गौड आणि भारती गौड या दोन्ही बहिणी गंभीररीत्या भाजल्या आहेत . सुदैवाइन या घटनेत वयोवृद्ध आजोबा आणि अवघ्या तीन वर्षांचा चिराग पार्थच्या प्रसंगावधानाने वाचला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अशोक साखरे, महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी उबाळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून घटनेचे नेमके कारण काय याचा पोलीस शोध घेत आहे. तसेच,घटनेतील संशयित कुमावत हा देखील भाजला असल्याची माहिती त्याला पळून जाताना पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी दिली.

घरातील वस्तू जळून खाक

घराला लागलेली आग बघून आजूबाजूच्या लोकांनी अग्निशमन दलाला आणि पोलिसांना फोन करून माहिती दिली तसेच,आजूबाजूच्या घरातून पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळविले. आग इतकी होती की,घरातील सिलींग फॅन जळून वाकून गेला होता,भिंतीचे आणि छताचे प्लास्टर गरम झाल्याने निखळून पडले होते,गॅलरीला लावण्यात आलेल्या काचा गरमीने फुटून गेल्या होत्या,तर टीव्ही पूर्णपणे वितळून गेल्याने भिंतीवर लोखंडी साचा उरलेला दिसत आहे,घरातील सोफा आणि कपाट आणि मुलांचे पुस्तके संपूर्णपणेजळून खाक झाले होते

Burnt House
VI चा RedX फॅमिली प्लॅन, अनलिमिटेड डेटासह मिळेल बरेच काही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.