Nashik News : आठ वर्षांपासून रेशनकार्ड बंद असल्याने रेशन मिळत नाही. पुरवठा कार्यालयात किती चकरा मारायच्या, असा आरोप करीत एकाने पत्नीसमोर नाशिक रोड येथील पुरवठा विभागाच्या कार्यालयात ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.
पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. (Attempted self immolation in ration supply office Nashik News)
धुळे जिल्ह्यातील सडगावमधील बापू बारकू पाटील हे पत्नी व चार मुलांसह नाशिक रोड येथील चेहेडी पंपिंग येथे मोलमजुरीसाठी स्थायिक झाले. त्यांनी धुळे तहसील कार्यालयाकडून तेथील रेशनकार्ड बंद करून ते नाशिक रोड येथे वर्ग करण्याबाबत पत्र केले.
त्याअनुषंगाने पाटील यांनी नाशिक रोड येथील पुरवठा विभागात धुळे तहसील यांचा नावे कमी करण्याचा दाखला सादर करीत रीतसर नोंदणी केली. पुरवठा विभागाने त्यांना नाशिक रोडमधील रेशनकार्ड दिले.
मालधक्का रोडवरील रेशन दुकानात गेल्यावर पाटील यांना सांगण्यात आले, की तुमचे कार्ड अपडेट झाले नसल्याने तुम्हाला रेशन मिळणार नाही. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकाऱ्यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला.
मात्र अपडेट करण्याची व्यवस्थाही दिल्ली येथे असून, अपडेट होण्यासाठी वेळ लागेल. रेशनकार्ड दिले, पुरवठा विभागाच्या दप्तरी नोंद आहे, तरीदेखील रेशन मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या बापू पाटील यांनी पत्नीसोबत कार्यालयातील रेकॉर्ड विभागात जात गनिमी काव्याने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शेजारी उभ्या असलेल्या सामाजिक कार्यकर्ता मंदा मथुरे व कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या लक्षात सदर बाब येताच त्यांनी पाटील यांना धरून ज्वलनशील पदार्थाची बॉटल घेतली व खिशातील दोन आगपेटीचे बॉक्स ताब्यात घेतले.
पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीस पोलिस ठाण्यात आणले. पाटील यांनी यापूर्वी दोन वेळा या कारणावरून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
आजपर्यंत सात तहसीलदार यांना पत्रव्यवहार केल्याचे व ते बदलून गेल्याचे पाटील म्हणाले. याबाबत पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की बापू पाटील यांना गेल्या चार महिन्यांपासून दुकानदार धान्य देत आहे.
त्याचे रेशनकार्ड पुरवठा कार्यालयात अपडेट झाले असून, दुकानदाराकडे अपडेट करण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. पुढील महिन्यापासून त्यांना नियमित धान्य मिळणार आहे. पुरवठा विभागाने बापू पाटील यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.