Nashik News : शिक्षण उपसंचालक कार्यालयातील ‘त्या’ महिला अधिकाऱ्याच्या चौकशीकडे लक्ष

Nashik News : शिक्षण उपसंचालक कार्यालयातील ‘त्या’ महिला अधिकाऱ्याच्या चौकशीकडे लक्ष
Updated on

Nashik News : शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वादग्रस्त महिला अधिकाऱ्याची सध्या विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त दर्जाच्या महिला अधिकाऱ्याकडे चौकशी सुरू असून, या चौकशीकडे सबंध शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

चौकशी पारदर्शी व्हावी, यासाठी काही माजी नगरसेवकांचा आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांचाही ‘वॉच’ आहे. (Attention to investigation of female officer in office of Deputy Director of Education nashik news)

इगतपुरीला विस्तार अधिकारी तसेच चांदवड येथे गटशिक्षणाधिकारी, नाशिक महापालिकेसह धुळे जिल्हा परिषद, नाशिक जिल्हा परिषदेत वादग्रस्त कारकीर्द ठरलेल्या महिला अधिकाऱ्याची सध्या नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील प्रादेशिक चौकशी अधिकारी डॉ. राणी ताठे यांच्याकडे चौकशी सुरू आहे.

अत्यंत गंभीर स्वरूपाचे कारनामे सदर महिला अधिकाऱ्याने केले असून, विविध ठिकाणी घडलेल्या गैरवर्तणूक, भ्रष्टाचार, स्वैराचार यासंबंधी चौकशी सुरू आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik News : शिक्षण उपसंचालक कार्यालयातील ‘त्या’ महिला अधिकाऱ्याच्या चौकशीकडे लक्ष
Nashik Drought News : कृषी अर्थव्यवस्थेला 5 हजार 300 कोटींचा तडाखा; सण, उत्सवांवर दुष्काळाचे सावट

वादग्रस्त ठरलेल्या या महिला अधिकाऱ्याची चौकशी पारदर्शकपणे झाली पाहिजे, यासाठी शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांसह नाशिक महापालिकेतील काही माजी नगरसेवकांचे लक्ष या चौकशीकडे असून, चौकशी पारदर्शकपणे व्हावी, असे मत शिक्षक संघटनांनी नोंदविले आहे.

सदर महिला अधिकाऱ्यांच्या विरोधात अनेक गंभीर तक्रारी आहेत. काही शिक्षकांनी या चौकशीसंदर्भात लिखित स्वरूपात आक्षेप चौकशी अधिकारी यांच्याकडे नोंदविलेले आहेत. त्याचप्रमाणे माहितीच्या अधिकारात सदर चौकशीची माहिती मागविलेली असल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून समजते आहे. सदर चौकशीत महिला अधिकारी निर्दोष सुटल्यास त्यांना शिक्षणाधिकारीपदाचे ‘प्रमोशन’ मिळणार असल्याने ही चौकशी शिक्षण क्षेत्रात लक्षवेधी ठरत आहे.

Nashik News : शिक्षण उपसंचालक कार्यालयातील ‘त्या’ महिला अधिकाऱ्याच्या चौकशीकडे लक्ष
Nashik Kumbhamela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचा प्रारूप आराखडा 8 हजार कोटींचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.