Atul Save | वैध सावकारशाही विरोधात संयुक्त पथके : अतुल सावे

atul save
atul saveatul save
Updated on

नाशिक : खासगी सावकारांच्या वसुलीमुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. हे थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस आणि सहकार विभागाची पथके निर्माण केली जाणार असून प्रत्येक जिल्ह्यात ही पथके संयुक्त मोहिमा राबवून कारवाई करतील,

अशा सूचना सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिल्या श्री. सावे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. (Atul Save statement Joint Teams Against Legitimate Moneylending nashik news)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

atul save
Board Exam : कायदा मोडण्याचे काम करू नका; परीक्षा संचलनासाठी सूचना

सावे म्हणाले की, सावकारांच्या परवान्याचा पुन्हा एकदा आढावा घेण्याच्या सूचना सहकार विभागाला दिल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात एकंदर २७३ जणांना सावकारी परवाने दिलेले आहेत. त्यातील अनेक भागात सावकारांच्या विळख्यात अडकलेल्या थकबाकीदारांना आत्महत्या कराव्या लागत असल्याचे प्रकार पुढे येत असल्याने सहकार विभागही सतर्क झाला आहे.

सावकारांकडून अडवणूक होणाऱ्या प्रकाराबाबत एकत्रित पावलं उचलण्यासाठी सहकार मंत्र्यांनी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि उपनिबंधकांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पथक त्वरित कारवाया करीत गुन्हे दाखल करण्याचे काम करतील.

सध्या सावकारांकडून होणाऱ्या अडवणुकीचे प्रकार वाढले असले तरी, पोलिस यंत्रणेकडून गुन्हे दाखल झाल्यानंतर थातूर मातूर कारवाई होते. प्रकरण शांत होते. आता अशा प्रकरणात सहकार विभाग पोलिस विभाग एकत्रित कारवाया करतील. जिल्हाधिकारी नियमितपणे आढावा घेउन सावकारांच्या अडवणुकीवर नियंत्रण ठेवू शकतील.

atul save
Sharad Pawar | विद्युत दुरुस्ती विधेयकाचा कायदा होऊ देणार नाही : शरद पवार यांची ग्वाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.