Nashik News: नाशिकमध्ये परकीय गुंतवणुकीचे शुभसंकेत! कॅमेरूनच्या उद्योजकाचा 3 कंपन्यांशी गुंतवणूकविषयक चर्चा

Entrepreneurs of Nashik in discussion with entrepreneurs of Cameroon
Entrepreneurs of Nashik in discussion with entrepreneurs of Cameroonesakal
Updated on

सातपूर (जि. नाशिक) : ईईपीसी इंडियातर्फे आयोजित आणि आयमा सहयोगी पार्टनर असलेल्या चेन्नई येथील आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनात इंटरनॅशनल इंजिनिअरिंग सोर्सिंग शोमधून नाशिकच्या उद्योजकांना त्यांच्या उत्पादनाच्या ब्रॅन्डिंगची नामी संधी मिळाली आणि त्याचेच फलित म्हणून कॅमेरूनच्या उद्योजकाने नाशिकच्या औद्योगिक परिसराला भेटी देऊन तीन उद्योजकांशी गुंतवणुकीबाबत डील केल्याने एकप्रकारे ते शुभसंकेतच म्हणावे लागेल, असे आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी सांगितले. (Auspicious sign of foreign investment in Nashik Cameroonian businessman talks with 3 companies about investment Nashik News)

चेन्नई येथील प्रदर्शनाचा लाभ उठवून नाशिकच्या उद्योजकांनी देशांतर्गत तसेच विदेशातील उद्योजकांशी ‘बी-टू-बी’ (बिझनेस टू बिझनेस)अंतर्गत परस्पर संवाद साधला होता. उद्योजकांच्या संघटित शक्तीचे फायदेही दृष्य स्वरूपात दिसले.

परस्पर संवादावेळी अनेकांनी नाशिकमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली होती आणि त्यानुसार आता आता हे उद्योजक नाशिकमध्ये डेरेदाखल होत आहेत. भविष्यात बाहेरचे आणखी काही उद्योजक नाशिकमध्ये येणार आहेत. नाशिकमधील गुंतवणूक त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वासही पांचाळ यांनी व्यक्त केला.

नाशिकमधून कोणती उत्पादने आयात करता येतील, याबाबत कॅमेरूनचे उद्योजक डेव्हिड यांनी गोगटे इलेक्ट्रो सिस्टिम कंपनीच्या संचालकांशी यशस्वी बोलणी केली. चेन्नई येथील प्रदर्शनात प्राथमिक स्वरूपात बोलणी झाल्यानंतर नाशिकमध्ये गुंतवणुकीच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, याची चाचपणीसुद्धा डेव्हिड यांनी केली.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Entrepreneurs of Nashik in discussion with entrepreneurs of Cameroon
Nashik News : माहिमनंतर आनंदवली दर्गा चर्चेत! दर्ग्याला NMCची नोटीस

अशाच प्रकारे डेव्हिड यांनी नाशिक मेटल डस्ट, श्रीगणेश इंडस्ट्रिअल कंट्रोल या कंपन्यांनाही भेटी देऊन त्यांच्या संचालकांशीही यशस्वी डील केली आहे.

"आयमातर्फे सुरू करण्यात आलेला निर्यात व्यवस्थापन अभ्यासक्रम आणि त्यानंतर निर्यातवाढीसाठी हाती घेतलेला जागृती कार्यक्रम याची चांगलीच फलनिष्पत्ती दिसून येत आहे. चेन्नई येथील औद्योगिक प्रदर्शनाने तर निर्यातीबाबतच्या डीलला अधिक गतीच मिळाली असून, आणखी देशांतर्गत तसेच विदेशातील गुंतवणूकदार नाशिकच्या उद्योजकांशी संपर्क साधून आहेत." - निखिल पांचाळ, अध्यक्ष, आयमा

Entrepreneurs of Nashik in discussion with entrepreneurs of Cameroon
Rahul Gandhi : हुकूमशाहीचा अतिरेक, लोकशाही धोक्यात! काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.