Shasan Aplya Dari
Shasan Aplya Dariesakal

Shasan Aplya Dari: प्रतिसाद मिळत नसल्याने अधिकारी चिंतेत! उपक्रमासाठी 40 हजाराची गर्दी जमविण्याचे उद्दिष्ट

Published on

Shasan Aplya Dari : १५ जुलैला नाशिक शहरात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविला जाणार आहे. पाऊस तसेच बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मतदार विटले असून, उपक्रमाला गर्दी जमविण्यासाठी जिल्हा प्रशासनासह स्थानिक स्वराज्य संस्थांनादेखील उद्दिष्ट देण्यात आले आहे.

भाजप, शिंदे गट व अजित पवार गटांच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनादेखील उपस्थितीचे बंधन असल्याने उपक्रमाची यशस्विता मनाएवजी गर्दीने दाखविण्याचा प्रयत्न आहे. (authorities worried of lack of response aim to gather crowd of 40 thousand for Shasan Aplya Dari nashik)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. १५) शासन आपल्या दारी उपक्रम राबविला जात आहे. उपक्रम यशस्वी करण्यासाठी चाळीस हजार नागरिकांना डोंगरे वसतिगृहावर जमण्याचे उद्दिष्ट शासकीय यंत्रणेला देण्यात आले आहे.

प्रशासनाने महापालिकेला दहा हजार लाभार्थी जमविण्याचे उद्दिष्ट दिले आहे. लाभार्थी जमविताना कुठल्याच नियम, अटी व शर्ती नाही. फक्त शरीराने संबंधित व्यक्त कार्यक्रमस्थळी दिसले पाहिजे, एवढीच महत्त्वाची अट आहे.

महापालिकेला लाभार्थी मिळविणे अवघड आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरच सक्ती करण्यात आली आहे. परंतु महापालिकेला लाभार्थ्यांची सक्ती करताना आकृतिबंधाचा कागदावर असलेला आकडा ग्राह्य धरण्यात आला आहे.

वास्तविक सेवानिवृत्तीसह अन्य कारणांमुळे महापालिकेची कर्मचारी संख्या घटल्याची बाब लक्षात घेतली गेली नाही. कर्मचाऱ्यांची वास्तविक संख्या लक्षात घेतल्यानंतर पाच हजार लाभार्थी गोळा करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.

त्यांनाच लाभार्थी समजून एसएमएस पाठविणे, दूरध्वनीवरून माहिती दिली जात आहे. परंतु ज्या लाभार्थ्यांना फोन जातो, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतं नसल्याने अधिकारी वर्ग चिंतेत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Shasan Aplya Dari
NMC RRR Centre News : समाजातील माणुसकी हरपली काय? दीड महिन्यात केवळ एकाची मदत..

पक्ष पदाधिकाऱ्यांना बोलाविण्याची वेळ

समाजकल्याण विभाग, महिला व बालकल्याण, पथविक्रेता, पीएम स्वनिधीचे लाभार्थी, महिला बचतगट, कौशल्य प्रशिक्षण लाभार्थी, दिव्यांग, घरकुल योजनेचे लाभार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविकांना निमंत्रित केले जात आहे.

परंतु या घटकांकडून प्रतिसाद मिळतं नाही. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना लाभार्थी म्हणून बोलाविण्याची वेळ आली आहे.

लाभार्थी उद्दिष्टाचा आकडा घटला

सुरवातीला जिल्ह्यातून चाळीस हजार लाभार्थी एकत्र करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यात नाशिक महापालिकेतून दहा हजार लाभार्थी होते.

परंतु प्रतिसाद मिळतं नसल्याने लाभार्थी गोळा करण्याचा आकडा घटत आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन. डी यांनी जिल्ह्यातून २५ हजार लाभार्थ्यांचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

Shasan Aplya Dari
NMC News: 2 महिने उलटले तरी घंटागाडी चौकशीचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यात! कारवाईची प्रतीक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.