Nashik News: डिंकाच्या लाडूचा गोडवा वाढणार; सुकामेव्याच्या दरात यंदा सरासरी 20 ते 30 टक्के घसरण

Dry Fruits
Dry FruitsSakal
Updated on

Nashik News : थंडीच्या दिवसात डिंक आणि मेथीचे लाडू सेवन केल्याने रोगप्रतिबंधक शक्ती वाढण्यास मदत होते. थंडीची चाहूल लागताच घरोघरी लाडू तयार करण्याचा जोर असतो. सुकामेव्याच्या दरात यंदा सरासरी २० ते ३० टक्के घसरण झाली आहे. त्यामुळे लाडूचा गोडवा वाढणार आहे.

धकाधकीच्या जीवनात अनेकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. घरातील ज्येष्ठ मंडळी मात्र सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आजही पुढे आहे. थंडीचे चाहूल लागताच डिंक आणि मेथीचे लाडू तयार करण्याच्या कामास सुरवात होते.

काजू, बदाम, खारीक, खोबरे, डिंक, मेथी, अक्रोड अशा विविध पदार्थांचा वापर करून लाडू तयार केले जातात. मेथीमुळे लाडूत काहीसा कडवटपणा येतो. (Average 20 to 30 percent fall in price of dry fruits this year nashik news)

इतर सुकामेव्याच्या घसरलेल्या दरामुळे मेथीचा लाडूतील कडूपणा नाहीसा होण्यास मदत होणार आहे. मेथी आणि डिंकाचे लाडू आरोग्यास सुदृढ राहण्यासाठी उपयोगी ठरत असतात. सुकामेवा घेण्यासाठी नागरिक दुकानांवर गर्दी करत आहे. सराफ बाजारातील शुक्ल गल्ली, बोहररपट्टी भागात सुकामेव्याचे दुकान सजले आहे. कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्या व्यक्तींकडून सकाळी दुधासह एक लाडू सेवन केला जातो. त्यामुळे शरीरास सुदृढ राहण्यास मदत होते. रोगप्रतिबंधक शक्तीतही वाढ होत असते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दरात मोठी घसरण झाली आहे. तरी थंडीचा कडाका वाढताच दरही वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली. रोग प्रतिबंधक शक्ती वाढवण्यासाठी नागरिकांकडून केवळ थंडीच्या दिवसाची वाट न पाहता वर्षभर सुकामेव्याचे विविध पदार्थ तयार करून सेवन केले जात आहे. त्यामुळे सुक्यामेव्याच्या मागणीत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरांमध्ये घसरण झाल्याने इतर पदार्थांपेक्षा सुकामेवा खरेदीकडे कल वाढला आहे.

"गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दरात घसरण झाली आहे. सध्या असलेले दर स्थिर आहे. नागरिकांचाही खरेदीकडे प्रतिसाद दिसून येत आहे. आगामी दिवसात दर वाढण्याची शक्यता आहे." - मयूर उग्रेज, विक्रेता

असं आहे दर (प्रति किलो)

Dry Fruits
Success Story: नौदलास गवसणी घातलेल्या हर्षलच्या सत्काराला जमला अख्खा गाव! प्रतिकूल परिस्थितीत संघर्षातून गरुडझेप

मेव्याचे प्रकार गेल्या वर्षीचे दर यंदाचे दर

खोबरे १८० १५०

खारीक (खजूर) २४० १८०

काजू ७५० ७२०

बदाम ७२० ६६०

डिंक २४० २४०

मेथी १४० १२०

अक्रोड(फोडलेले) १ हजार १०० ९००

साधे अक्रोड ६०० ६००

पिस्ता खारा १ हजार १०० १ हजार

ग्रीन पिस्ता २ हजार ४०० २ हजार

गोडंबी ७५० ९००

वेलची २ हजार २०० २ हजार २००

Dry Fruits
Holiday 2024: नोकरदार वर्गाला पुढील वर्षी मिळणार सुट्यांची मेजवानी! सुट्यांचे शतक पूर्ण करण्याची संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.