वैभव सोनवणे : सकाळ वृत्तसेवा
Success Story : येथील एका मध्यमवर्गीय कामगार कुटुंबातील अविनाश विजय खैरनार याने मोठ्या जिद्दीने लष्करी भरतीसाठीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाला. परीक्षा उत्तीर्ण झाल्याने तो लष्कर भरतीसाठी पात्र झाला आहे.
घरची परिस्थिती बेताचीच अल्पशा मजुरीवर पोट भरणारे कुटुंब, वडील निरक्षर, मात्र आई वडिलांची प्रेरणा व ध्येयासाठी प्रभावित झालेल्या अविनाशने प्रचंड कष्टातून लष्करात झेंडा रोवला. त्याच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Avinash Khairnar Passed entrance exam for military recruitment nashik news)
अविनाशचे प्राथमिक शिक्षण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. केबीएच विद्यालय व ज्युनिअर कॉलेज वडेल येथूनच त्याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी मालेगाव गाठले.
आपल्या मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत व त्याच्याकडून प्रेरणा घेत दररोज पहाटे धावणे, परिस्थिती बेताची असल्याने दिवसा लागेल त्याठिकाणी कामाला जाणे, शेतीशी निगडित कामे, बांधकाम, वीटकाम आदी कामे करत त्याने अभ्यासही सुरु ठेवला.
लष्करात असलेल्या ज्येष्ठ आणि मित्रांची मदत घेत त्याने स्वतःला तयार केले. शिक्षण सुरु असतानाच त्याने कुटुंबालाही हातभार लावला. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने लष्कराची आवड असल्याने एनसीसीत प्रवेश घेतला. एनसीसी करत असताना त्याने पहिल्याच भरतीत मैदान मारले. वैद्यकीय चाचणीतही तो यशस्वी झाला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
परंतु अभ्यासात दुर्लक्ष झाल्याने भरतीतील गुणवत्ता यादीत (मेरिट लिस्ट) त्याला स्थान मिळाले नाही. यानंतरही तो डगमगला नाही. जिद्दीने व चिकाटीने त्याने अभ्यास, मैदान सुरु ठेवले. अखेर त्याच्या कष्टाला फळ मिळाले. त्याने परीक्षा, मैदान व वैद्यकीय चाचणी यात बाजी मारली. अन लष्कर भरतीचे स्वप्न साकार केले.
तरुणाकडून भरतीची तयारी
प्रतिकूल परिस्थितीत अविनाशने मिळविलेल्या यशाने गावातील तरुणांसाठी तो आदर्श ठरला आहे. देशसेवेत दाखल झाल्याचे स्वप्न साकार झाल्याने त्याच्यासह कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. अविनाशच्या पावलावर पाऊल ठेवत पंचक्रोशीतील अनेक तरुण लष्कर भरतीसाठी तयारी करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.