Healthy Plan for Diwali : ‘चटपटीत’चा टाळा मोह, पौष्टिक आहारातून सुदृढ रहा..!

Eat Right This Diwali
Eat Right This Diwaliesakal
Updated on

नाशिक : दिवाळीचा सण म्‍हटला, की गोडधोड अन्‌ तिखट, तेलकट, कुरकुरीत, चटपटीत पदार्थ डोळ्यासमोर येतात. मात्र, सध्याच्‍या वातावरणातील बदलांचा विचार करता, चांगले आरोग्‍य राखायचे असेल, तर चटपटीत पदार्थांचा मोह टाळायला हवा. त्‍याऐवजी पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करून, तसेच अन्‍य खबरदारी घेताना सुदृढ आरोग्‍य राखण्याचा सल्‍ला तज्‍ज्ञांकडून दिला जात आहे. (Avoid temptation of fast food stay healthy with nutritious food Healthy Plan for Diwali Nashik News)

Eat Right This Diwali
Recipe: ब्रेकफास्टमध्ये खा टेस्टी अन् हेल्दी भेळ पोहे, पाच मिनिटांत होणारी रेसिपी

ऋतूमानातील बदलानुसार आहारात बदल केल्‍यास प्रकृतीच्‍या तक्रारी जाणवत नाहीत. सध्या अवकाळी पावसाचे आव्‍हान असताना, दिवसा कडक ऊन आणि रात्री वातावरणात गारवा जाणवत आहे. अशा मिश्र स्‍वरूपाच्‍या वातावरणात आरोग्‍याची विशेष काळजी घेणे आवश्‍यक आहे. वातावरणातील आव्‍हानात्‍मक परिस्‍थितीमुळे यंदा फराळाच्‍या पदार्थांवर ताव मारताना संयमाची भूमिका घ्यावी लागणार आहे. लहान मुलांबाबत खबरदारी घेताना छोट्या-छोट्या उपाययोजनांतून त्‍यांचे आरोग्‍य चांगले राखता येईल, असे जाणकार सांगतात.

ताजे जेवण घ्यावे, दूग्‍धजन्‍यचा मर्यादित करा वापर

सध्याच्‍या वातावरणाचा विचार करता आहारात ताजे व गरम अन्न घ्यावे. भाजीपाल्‍यासह फळांचे सेवन करावे. दूध किंवा दुग्‍धजन्‍य पदार्थांचा मर्यादित स्‍वरूपात आहारात समावेश असावा. तेलकट, तुपकट पदार्थ, शिळे अन्नपदार्थ खाण्याचे टाळावे.

अभ्यंग स्‍नानाला करा सुरवात

सामान्‍यतः दिवाळीपासून अभ्यंग स्‍नानाला सुरवात केली जाते. मात्र, सध्याच्‍या वातावरणातील बदल लक्षात घेता, आतापासूनच अभ्यंगस्‍नानाला सुरवात केलेले उपयुक्‍त आहे. ऋतूमानात सुधारणा होईपर्यंत अभ्यंगस्‍नान आरोग्‍यासाठी हितकारी ठरेल.

Eat Right This Diwali
Healthy Food : भरपूर पोषण देणारा पालक पराठा; पहा रेसिपी

अशी घ्या आरोग्‍याची काळजी..

*रात्री जेवणानंतर ग्‍लासभर गरम पाणी प्‍या

*गोड पदार्थ खाल्‍यानंतर काही वेळ पाणी पिऊ नका

*मर्यादित स्‍वरूपात मांसाहार करा

*जेवणात कुरासणीची चटणी, आल्‍याचे लोणचे/रसचा समावेश करा

*कैरीच्‍या लोणच्‍याचे सेवन टाळा

*सकाळी खजूर, दिवसा काळे मनुके व रात्री अंजीर खाणे उत्तम

*तांदळाच्‍या पदार्थांचे आहारातील प्रमाण वाढवावे

*मूग, मसूर, मटार, शेवगा, गाजरचे प्रमाणही वाढविणे हितकारी

*लहान मुलांमध्ये मध-आल्‍याचा चमचाभर रस वाढवितो प्रतिकारशक्‍ती

*चिमुकल्‍यांच्‍या छातीला तेल, नाकात तुप टाकलेले फायदेशीर

Eat Right This Diwali
Green Peas: हिरवे मटर आरोग्यासाठी अगदी बेटर! चमकदार त्वचा अन् बरंच काही..वाचा फायदे

पौष्टिक आहाराविषयीचे गीतेतील उपदेश

आयुः सत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः ।

रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः ॥

(श्रीमद्‌ भगवद गीता अध्याय १७ वा आणि श्‍लोक ८ वा)

अर्थात, आयुष्य वाढविणारे, मन-बुद्धीला शुद्ध करणारे, शरीर सृदढ करणारे आणि शक्ती देणारे, सुख-शांती प्रदान करणारे असे रसयुक्त, स्निग्ध, अधिक काळ टिकणारा आहार सात्विक व्यक्तींना अधिक प्रिय असतो.

कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिनः ।

आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः ॥

(श्रीमद्‌ भगवद गीता अध्याय १७ वा आणि श्‍लोक ९ वा)

अर्थात, कडवट, गोड, खारट, उष्ण, चटपटीत अशा स्वरूपाचे भोजन आसक्ती असलेल्या व्यक्तींना अधिक आवडते. त्यातून दुःख, रोग उत्पन्न होतात.

यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत्‌ ।

उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्‌ ॥

(श्रीमद भगवद गीता अध्याय १७ वा आणि श्‍लोक १० वा)

अर्थात, अधिक काळ ठेवलेले, स्वादहीन, दुर्गंधीयुक्त, उष्टे केले अन्न अपवित्र असते.

"वातावरणातील बदल आरोग्‍यासाठी आव्‍हान निर्माण करू शकतात. आतापासून अभ्यंग स्‍नानाला सुरवात करताना आहारातही उचित बदल केले पाहिजेत. पौष्टिक पदार्थांचा समावेश वाढविताना स्‍निग्‍ध पदार्थांचे प्रमाण मर्यादित ठेवावे. जेवणानंतर ग्‍लासभर गरम पाणी प्‍यावे. लहान मुलांना मध-आल्याचा रस देताना ज्‍येष्ठांच्‍या आरोग्‍याची विशेष काळजी घ्यावी."

- वैद्य विक्रांत जाधव

Eat Right This Diwali
Recipe: वजन कंट्राेलमध्ये ठेवायंच? नाश्त्यात खा पौष्टीक अन् टेस्टी नाचणीचा उपमा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.