नाशिक : कळवण (Kalavan) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात झालेल्या कंत्राटी शिक्षक भरती (Contract Base teacher recruitment) प्रकरणी यात आर्थिक गैरव्यवहार (Financial malpractice) झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याच्या आदेशानंतर आता अपर आयुक्त कार्यालयास अहवालाची प्रतीक्षा आहे. या प्रकरणी प्रकल्पाधिकारी यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे. तक्रारीत तथ्य आढळून आले असल्यास संबंधित निवड समिती अध्यक्षावर शासनाकडून कारवाई केली जाईल, असे संकेत विभागाकडून देण्यात आले.
कळवण प्रकल्प कार्यालयांतर्गत सराड (ता. सुरगाणा), कनाशी (कळवण), भिलवाड (ता. बागलाण) येथील इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेत इंग्रजी विषय शिकविण्यासाठी कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नेमणूक केली जाणार होती. यासाठी २ फेब्रुवारीला मुलाखती (Interview) घेण्यात आल्या. प्रकल्पाधिकारी यांनी शिक्षक नेमणुकीसाठी आस्थापना सहाय्यक प्रकल्पाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन केली. मात्र या कंत्राटी भरतीत निवड समितीच्या अध्यक्षांकडून मध्यस्थींच्या माध्यमातून उमेदवारांकडे पैशांची मागणी केल्याची तक्रार कळवण पोलिस ठाण्यात करण्यात आली. तक्रार दाखल होताच संबंधित आस्थापना अधिकारी त्या दिवसांनंतर पुढील काही दिवस कार्यालयात गैरहजर राहिले. यामुळे तक्रारीत तथ्य असल्याचा संशय अधिक बळवला.
कंत्राटी शिक्षक भरती प्रकरणी तक्रारीची दखल अपर आयुक्त आणि आदिवासी आयुक्त कार्यालय (Tribal Commissioner Office) यांनी घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करत अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रकल्प अधिकारी यांना दिल्या. या प्रकरणी प्रकल्प अधिकारी यांनी तत्काळ सदरची भरतीप्रक्रिया रद्द करत पुन्हा नव्याने भरतीप्रक्रिया राबविली जाईल, असे सांगितले. या प्रकरणास २० दिवसांचा कालावधी उलटूनही तक्रारींच्या अनुषंगाने अहवाल अपर आयुक्त कार्यालयास (Additional Commissioner Office) प्राप्त झालेला नसून कार्यालयास या अहवालाची (Report) प्रतीक्षा आहे. यातच कंत्राटी शिक्षक भरती निवड समिती अध्यक्ष (आस्थापना विभाग) कामावर हजर झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.