Janmashtami 2023 : जन्माष्टमीनिमित्त पथनाट्याच्या माध्यमातून विचारांचा जागर; ‘स्वाध्याय’च्या लाखो तरुणांचा सहभाग

Krishna janmashtami 2023
Krishna janmashtami 2023Esakal
Updated on

Janmashtami 2023 : वैश्विक स्वाध्याय कार्याचे प्रवर्तक पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांच्या प्रेरणेने स्वाध्याय परिवारातील युवकवर्ग श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करतो.

भगवान श्रीकृष्णाची जयंती केवळ दहीहंडी फोडून न करता त्याचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोचावेत म्हणून दादांनी युवकांना पथनाट्याची संकल्पना दिली.

स्वाध्यायाची धुरा सांभाळणाऱ्या धनश्री श्रीनिवास तळवलकर (दीदी) यांच्या मार्गदर्शनाने पथनाट्याच्या माध्यमातून लाखो युवक देशविदेशात विचार घेऊन जात आहेत. (Awakening of thoughts through street drama on occasion of Janmashtami nashik news)

यंदा १५ राज्यांत, तसेच इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, आखाती यांसारख्या विविध देशांतही युवकांच्या जवळपास २० हजार टीम्स म्हणजे दोन लाख युवक ‘मेरी मर्जी’ पथनाट्यातून सर्वांना विचार करण्यास प्रवृत्त करणार आहेत. विविध भाषांमधून पथनाट्ये ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर कालावधीत सादर करण्यात येतील.

विशेष म्हणजे कोणत्याही प्रलोभनाशिवाय आपलं शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून युवक पथनाट्य सादर करतात. आज समाजात सर्वत्र मन मानेल तसं, मला हवं तसं, माझ्या मर्जीने एक प्रकारचं उच्छृंखल जीवन जगण्याकडे कल दिसतो. यास ‘मेरी मर्जी’ असे म्हणतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Krishna janmashtami 2023
Janmashtami : 'या' गाण्यांसह साजरी करा कृष्ण जन्माष्टमी

जीवनात खरंच आपली मर्जी, आपलं मत किती ठिकाणी विचारलं जाते, शेवटी ईश्वराचीच मर्जी चालते; परंतु त्या ईश्वराविषयी कृतज्ञता ठेवून, त्याचे प्रेम ओळखून आपण आपली मर्जी त्याला हवी तशी बदलू शकतो, तसेच ईश्वराला केंद्रस्थानी ठेवून एक निरपेक्ष, दैवी, संबंध साकार करू शकतो अशाप्रकारचा एक संदेश हे पथनाट्य देते.

आज समाजात जन्माष्टमी म्हटलं, की फक्त दहीहंडीची उंची, थर आणि त्यासाठी लाखोंची बक्षिसे इतकीच चर्चा करणारे आपण श्रीकृष्णाची, त्याच्या विचारांची आणि दहीहंडीच्या उत्सवाची उंची किती कमी करतोय, याचं भान कुणालाच राहिलेलं नाहीय. अशा विपरीत काळात स्वाध्याय परिवाराच्या युवकांची जन्माष्टमीनिमित्त प्रतिवर्षी सादर होणारी पथनाट्ये एक सकारात्मक आशेचा किरण आहेत, हा विश्वास वाटतो.

Krishna janmashtami 2023
Janmashtami: दहीहंडीला 'सेलिब्रेटी' म्हणून बोलावलं तर...चिमुरडी मायरा काय म्हणाली पाहा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.