Ayushman Bharat Yojana : ‘आयुष्यमान’ कार्डचे 5 लाख लाभार्थ्यांना वाटप

ayushman bharat golden card news
ayushman bharat golden card news esakal
Updated on

कळवण (जि. नाशिक) : आरोग्य व कुटुंबकल्याण खात्यांतर्गत आयुष्यमान भारत वैद्यकीय विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत जिल्ह्यात ११ लाख ५६ हजार ४३६ पात्र लाभार्थी आहेत. यात आतापर्यंत पाच लाख २१ हजार ६५१ लाभार्थींना आयुष्यमान कार्डचे वाटप करण्यात आले आहे. (Ayushman Bharat Yojana Distribution of Ayushman cards to 5 lakh beneficiaries nashik news)

कार्ड मिळालेल्या लाभार्थ्यांना जिल्ह्यातील खासगी व सरकारी ५८ हॉस्पिटमध्ये पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. जिल्ह्यात अजूनही ६ लाख ४३ हजार ७८५ पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. यामुळे जे राहिलेले लाभार्थी आहेत, त्यांनी ऑनलाइन अर्ज करून ई कार्ड काढून घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

आयुष्यमान योजनेत जिल्ह्यातील ११ लाख ५६ हजार ४३६ पात्र लाभार्थी आहेत. यात ग्रामीण भागातील लाभार्थीचा जास्त समावेश आहेत. सर्वसामान्यांना मोठ्या आजारांचा सामना करण्यात यावा, यासाठी या योजनेची सुरवात करण्यात आलेली आहेत. आरोग्य विभागाकडून या योजनेतील लाभार्थींना ऑनलाइन अर्जाद्वारे कार्डची वाटप करण्यात येत आहेत.

ayushman bharat golden card news
YCMOU News : मुक्त विद्यापीठाच्‍या विद्यार्थ्यांसाठी ‘ई-सुविधा’; प्‍लेस्‍टोअरवर App उपलब्‍ध

तालुकानिहाय लाभार्थी

तालुका पात्र लाभार्थी कार्ड - कार्ड वाटप मिळालेली टक्केवारी

बागलाण १०६०८० ४१३०८ ३९%

चांदवड ५०२०८ २६६८७ ५३%

देवळा ३१३७९ १८९३७ ६०%

दिंडोरी ९७६६४ ५२६९८ ५४%

इगतपुरी ७४४६७ ३१११९ ४२%

कळवण ७६०४२ ३९५३७ ५२%

मालेगाव ११००४५ २६८५७ २४%

नांदगाव ७७२४८ २६३६६ ३४%

नाशिक ४५२५८ २७३२२ ६० %

निफाड ९८२९१ ५०२२८ ५१%

पेठ ७०४५८ ३५४११ ५०%

सिन्नर ७०११६ ३१२३२ ४५ %

सुरगाणा ११०५५० ५४९८० ५०%

त्रम्बकेश्वर ७७६०३ ३१२०५ ४०%

येवला ६१०२७ २७६६४ ४५%

एकूण ११५६४३६ ५२१६५१ ४५%

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

ayushman bharat golden card news
Nashik News : क्रीडा स्पर्धेच्या वाढीव तरतुदींबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी अंधारात!

या ठिकाणी अर्ज करण्याची सुविधा आहे

"आयुष्यमान ई कार्ड काढण्यासाठी जिल्ह्यातील ग्राहक सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी मोफत ऑनलाइन अर्ज करता येतो. आयुष्यमान योजनेत लाभार्थ्यांना ५ लाखांपर्यंत उपचार मोफत मिळतो. यामुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी आयुष्यमान कार्ड काढून योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा."

- डॉ. पंकज दाभाडे, जिल्हा समन्वयक, आयुष्यमान योजना नाशिक

ayushman bharat golden card news
Nashik News: रामतीर्थावर गौतम ऋषींची 800 वर्षांपूर्वीची मूर्ती! तीर्थजल कमी झाल्यावर मूर्तीचे घडते दर्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.