निफाड (जि. नाशिक) : पोलिस अधिक्षक सचिन पाटिल यांच्या संकल्पनेतुन नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने आयोजित आजादी का अमृत महोत्सव पोलीस दौडचे निफाड तालुक्यातील चांदोरी सायखेडा पिंपळस नायताळे सह ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले.
निफाड शहरातील शांतीनगर चौफुली पोलीस दौड येताच ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आकाशबाजी करून निफाड पोलीस निफाड नगरपंचायत व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. (Azadi Ka Amrit Mahotsav 2022 police race welcome in Niphad taluka nashik Latest Marathi News)
नाशिक ते येवला या 75 किलोमीटरच्या अंतरात नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव पोलीस दौड चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 75 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. निफाड येथील न्यायमूर्ती रानडे स्मारक येथे पोलीस दौडच्या वतीने न्यायमूर्ती रानडे यांना अभिवादन करण्यात आले. त्या नंतर निफाड पंचायत समिती येथे हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे, पोलीस निरीक्षक रंगराव सानप, निफाड नगरपंचायत उपनगराध्यक्ष अनिल कुंदे, शिवाजी ढेपले, संपत व्यवहारे, नंदू कापसे, दीपक गाजरे, सुहास सुरळीकर, सचिन खडताळे यांच्यासह पोलीस कर्मचारी जेष्ठ नागरिक संघाचे कार्यकर्ते आणि निफाडकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर पोलीस दौड येवल्याच्या दिशेने रवाना करण्यात आली आहे.
निफाड तालुक्याच्या पिंपळसला अरुण डांगळे विलास मत्सागर यांच्यासह ग्रामस्थ शालेय विद्यार्थ्यांनी स्वागत केले. तसेच ओम गायत्री नर्सरीतर्फे मधुकर गवळी , सांगळेकोल्डस्टोरेज यांच्या वतीने संजय सांगळे , खरात अकेडमी ,समर्थ अँकेडमी माणकेश्वर वाचनालय येथे मधुकर शेलार तर हुतात्मा स्मारक येथे सागर निकाळे यांच्यासह अधिकारी वर्गाने स्वागत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.