Baban Gholap Resign : देवळाली मतदारसंघाचे २५ वर्षे प्रतिनिधित्व केलेले शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रातील पहिले आमदार, माजी समाजकल्याणमंत्री, नेते आणि उपनेते बबनराव घोलप यांना शिर्डी लोकसभेच्या संपर्कप्रमुखपदावरून हटविल्याने त्यांनी शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात आणि ठाकरे गटात खळबळ उडाली. दरम्यान, आपण कार्यकर्त्यांशी बोलूनच पुढील निर्णय घेऊ, असे श्री. घोलप यांनी म्हटले आहे. (baban Gholaps resignation as deputy leader of uddhav thackeray Shiv Sena nashik political news)
पंधरा दिवसांपूर्वी भाऊसाहेब वाकचौरे यांना उद्धव ठाकरे यांनी पक्षात घेऊन घोलप यांना मोठा धक्का दिला.
शिवाय, लोकसभा संपर्क नेतेप्रमुखांची जबाबदारी माजी आमदार विलास शिंदे यांच्याकडे दिल्याने घोलप यांचा पत्ता कट झाल्याची चाहूल लागल्याने घोलप यांनी उपनेतेपदाचाही राजीनामा दिला आहे.
देवळाली मतदारसंघ आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी ही राजकीय घडामोड महत्त्वाची मानली जात आहे. घोलप आता यापुढे कोणती राजकीय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
चार महिन्यांपूर्वी घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
सतत ३० वर्षे प्रतिनिधित्व
शिवसेना (ठाकरे गट) शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुखपदावरून हटविल्याने नाराज झालेल्या घोलप यांनी आता उपनेतेपदाचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे ते पुढे कोणता राजकीय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
श्री. घोलप यांनी या मतदारसंघाचे २५ वर्षे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यानंतर त्यांचे पुत्र योगेश घोलप यांनी पाच वर्षे प्रतिनिधित्व केले. तीस वर्षांच्या काळात एकदा या मतदारसंघाला लाल दिवा (मंत्रिपद) मिळाला होता.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्या वेळी घोलप यांना समाजकल्याणमंत्रिपद मिळाले होते. २०१९ मध्ये नवीन उमेदवाराला संधी म्हणून सरोज आहिरे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसला हा मतदारसंघ खेचून आणण्यात यश आले होते. नंतर घोलप यांना शिर्डीकडे लक्ष देण्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.
"मी शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला असून, सध्या केवळ शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरे यांनी मला बोलवून शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली होती. मात्र, १५ दिवसांपूर्वीच वाकचौरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आता लोकसभा संपर्कप्रमुखपदावरून मला काढण्यात आल्याने मी राजीनामा दिला आहे. कार्यकर्त्यांशी बोलून मी पुढचा राजकीय निर्णय जाहीर करेन. मिलिंद नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंचे कान भरवले आणि हा बदल केल्याचे माझे स्पष्ट मत आहे."
- बबनराव घोलप, माजी मंत्री
निवाडा अपूर्ण, निवडणूक कशी लढविणार?
शिवसेनेचे माजी उपनेते बबनराव घोलप यांना न्यायालयाने निवडणूक लढविण्यास बंदी घातलेली आहे. शिवाय, त्यांचा न्यायनिवाडा अजून झालेला नाही. उच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे, तरीही ते समाज माध्यमांवर निवडणूक लढविणार, अशा प्रतिक्रिया देत आहेत.
त्यांच्यावरील निवडणुकीची बंदी अजून न्यायालयाने उठवलेली नाही, मग ते निवडणूक कशी लढवू शकतात? मी गेल्या २३ वर्षापासून न्यायालयात घोलपांविरोधात भ्रष्टाचाराच्या प्रकरणासंबंधी आवाज उठवत आहे.
याबाबत मी काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगालाही पत्र दिले आहे, असे तक्रारदार मिलिंद यवतकर (मुंबई) यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.