Baban Gholap Resign: बबनराव घोलप यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडून नामंजूर

Baban Gholap
Baban Gholapesakal
Updated on

Baban Gholap Resign : शिवसेना उपनेते व शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आपल्या पदाचा दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता.

मात्र, हा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी नाकारला. दोन दिवसांनंतर पुन्हा यावर चर्चा होणार आहे. (Babanrao Gholaps resignation not accepted by party leaders nashik)

आपल्याला विश्वासात न घेता शिर्डीचे संपर्कप्रमुख म्हणून आमदार सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे बबनराव घोलप यांनी आपल्या शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींना पाठविला होता.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून स्वतः बबनराव घोलप इच्छुक होते. येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहणार होते. परंतु अचानकपणे माजी खासदार भानुदास वाकचौरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला, त्यामुळे घोलप यांच्या उमेदवारीबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Baban Gholap
Shivsena Vs Modi : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कुलभूषण जाधवांना भारतात आणणार का? उद्धव ठाकरेंचा मोदींना खोचक प्रश्न

परिणामी, बबनराव घोलप यांनी आपल्या दोन्ही पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या या राजीनामामुळे संपूर्ण राज्यात व राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. राजीनामानंतर चर्चेसाठी बबनराव घोलप यांना मुंबई येथे बोलविण्यात आले होते.

त्यानुसार आज खासदार संजय राऊत यांच्याबरोबर चर्चा झाली. सदरचा राजीनामा न स्वीकारल्याचे सांगण्यात आले.

तसेच याबाबत दोन दिवसांत पुन्हा चर्चा करण्यात येईल, असे सांगण्यात आले. या चर्चेप्रसंगी उत्तर नगरचे जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, भारत मोरे, संदीप आयनोर आदी उपस्थित होते.

Baban Gholap
Baban Gholap Resign: घोलपांचा शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा! शिर्डी संपर्कप्रमुखपदावरून काढल्याने नाराजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.